Vitamin Deficiency: 'या' तीन व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होउ शकते दातदुखीची समस्या

तुमच्याही दातांमध्ये वेदना होत असेल तर असु शकते या व्हिटॅमिन्सची कमतरता
Vitamin Deficiency
Vitamin DeficiencyDainik Gomantak
Published on
Updated on

Vitamin Deficiency: दात हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जर आपल्याला स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायचा असेल तर दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.

दात आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. कारण परिपूर्ण हसण्यासाठी ते स्वच्छ आणि नीटनेटके असणे आवश्यक आहे. तोंडाच्या स्वच्छतेचेही एकंदर आरोग्यासाठी महत्वाचे आहे. जर आपण याकडे लक्ष दिले नाही तर तोंडातून तीव्र दुर्गंधी येऊ लागते.

ज्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणा-या लोकांना त्रास सहन करावा लागतो. काही लोक दातांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे दातांमध्ये वेदना आणि रक्तस्रावाची समस्या उद्भवते. 

  • दातांची काळजी घेणे गरजेचे

दातांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर रोजच्या आहारात आपण काय खातो याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. साधारणपणे अनेक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला दातांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे पायोरियासारखे रोग होऊ शकतात.

Vitamin Deficiency
Vastu Tips: घरात बासरी असल्यास नष्ट होतात घरातले दोष? वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र

या जीवनसत्त्वांच्या कमतरता असेल तर...

  • व्हिटॅमिन बी 12

दातांच्या निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे आहे. त्याचा दातांच्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि ते कमकुवत होऊ शकतात. जे नंतर पायोरियाचे रूप धारण करू शकते. यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि फॅटी माशांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

  • व्हिटॅमिन सी

पायोरियाचे प्रमुख कारण म्हणजे व्हिटॅमिन सीची कमतरता हे पोषक आपली प्रतिकारशक्ती सुधारते. यासोबतच यामध्ये असलेले गुणधर्म आपल्याला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून (Virus) वाचवतात. हे पोषक मिळवण्यासाठी तुम्ही लिंबूवर्गीय पदार्थ खाऊ शकता. यामध्ये संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांचा समावेश होतो.

  • व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपले दात देखील या हाडांचा एक भाग आहेत. यामुळे व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे पोषक मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दिवसातून 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे. 

  • दातांची स्वच्छता आवश्यक

दातांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत. अन्न खाल्ल्यानंतर पूर्णपणे स्वच्छ धुणे आवश्यक आहे. दात आणि हिरड्यांमध्ये प्लेक जमा होऊ देऊ नका. जर अन्नाचा काही भाग दातांच्या अंतरात अडकला असेल तर डेंटल फ्लॉस वापरा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com