Video Viral: मसाला डोसा आइस्क्रीम रोल विचित्र फुडकॉम्बिनेशन!

दिल्लीतील एका दुकानात मसाला डोसा आइस्क्रीम रोल तयार केला जात आहे
Video viral while making masala dosa ice cream roll
Video viral while making masala dosa ice cream roll Dainik Gomantak
Published on
Updated on

स्वादिष्ट अन्न खायला कोणाला आवडत नाही. असे काही लोक आहेत जे स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. आपण काही चांगले खाल्ले तर आपले मन प्रसन्न होते. मात्र काही वाईट चवीच पदार्थ (Food) खाल्ले तर तोंडाच्या चवीसोबतच दिवससुद्धा खराब जातो.

विचित्र फुडकॉम्बिनेशन

एक अतिशय विचित्र कॉम्बिनेशन डिश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पदार्थ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ही डिश सगळ्यांच्या आवडत्या आईस्क्रीमपासून बनवली जाते. या विचित्र कॉम्बिनेशन डिशचे नाव आहे मसाला डोसा आइस्क्रीम. दुकानदाराने मसाला डोसा आणि आईस्क्रीम मिळून ही डिश तयार केली आहे.

Video viral while making masala dosa ice cream roll
Methi Mathri Recipe: थंडीमध्ये चहासोबत आस्वाद घ्या मेथी मठरीचा

सोशल मीडियावर ही डिश पाहून लोकांनी डोक्यालाच हात लावला आहे. ही अतिशय विचित्र डिश इंस्टाग्रामवर thegreatindianfoodie नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. या डिशचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. या डिशचा व्हिडीओ शेअर करतांना त्यासोबत 'दिल्ली मसाला डोसा आईस्क्रीम पहा व्हिडिओ' असे कॅप्शन दिले आहे.

Video viral while making masala dosa ice cream roll
Smart Cooking Tips: 'सुजी हलव्यांची' अशी करा चव दुप्पट

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक दुकानदार आधी मसाला डोसा एका थंड तव्यावर ठेवतो. यानंतर, त्यावर दोन स्कूप आइस्क्रीम टाकतो आणि नंतर तो मिक्स करतो. यानंतर, तो रोल तयार करतो. आश्चर्यकारक बाब म्हणजे दुकानदार त्याच्यासोबत नारळ आणि हरभऱ्याची चटणी खायला देतो. यानंतर, तो सजावटीसाठी त्यावर मसाला डोशाचा एक तुकडा देखील ठेवतो. हे पाहून सोशल मीडिया यूजर्समध्ये नाराजी पसरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com