White Shoes Cleaning Tips: पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

पांढरे शूज प्रत्येक ड्रेसवर मॅच होतात. यामुळे सध्या पांढरे शूजची क्रेझ वाढली आहे.
White Shoes Cleaning Tips
White Shoes Cleaning TipsDainik Gomantak

White Shoes Cleaning Tips: मुलांना शूज घालण्याची खूप आवड असते. मार्केटमध्ये शूजच्या वाढत्या डिमांडमुळे शूज अनेक डिझाइन आणि रंगात मिळतात. पांढऱ्या शूजची क्रेझ जास्त आहे.

ट्रेंडी पांढरे शूज घालणे अनेक लोकांना आवडते. कारण ते प्रत्येक ड्रेससोबत मॅच होते. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते टीव्ही कलाकारांपर्यंत, प्रत्येकजण त्यांच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये पांढरे स्नीकर्स किंवा शूज वापरतात. 

पण त्रास होतो जेव्हा पांढरे शूज घाण होतात आणि स्वच्छ करावे लागतात. तथापि, काही सोप्या पद्धती आहेत ज्यामुळे तुमचे घाणेरडे किंवा डागलेले पांढरे स्नीकर्स नवीनसारखे चांगले दिसतील.

  • व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर या दोन्हीमध्ये असे गुणधर्म आहेत जे शूज स्वच्छ करण्यास मदत करतात. या दोन्हींचा एकत्रित वापर केल्यास दुर्गंधी आणि बुरशी कमी होते. परंतु लक्षात ठेवा की या मिश्रणाने फक्त चामड्याचे, कपड्यांचे शूजचे तळवे स्वच्छ करावे.

यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा व्हिनेगर आणि एक चतुर्थांश कप बेकिंग सोडा मिक्स करावे. फेस येईपर्यंत चांगले मिक्स करावे. त्यानंतर ब्रशच्या साह्याने शूजवर मिश्रण लावा आणि काही वेळ राहू द्या. यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. 

  • नेल पेंट रिमूव्हर

लेदर शूज किंवा पांढऱ्या स्नीकर्सवरील स्क्रॅच नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने सहज स्वच्छ करता येते. सर्वात पहिले रिमूव्हरमध्ये कॉटन बॉल भिजवा आणि नंतर डाग घासून घ्यावे. नंतर डाग काढून टाकल्यानंतर, शूजवर पावडर किंवा पेट्रोलियम जेली लावावे. 

  • साबण आणि पाणी

कोणत्याही प्रकारचे लिक्विड डिशवॉशर तुमचे पांढरे स्नीकर्स स्वच्छ करू शकतात. ही प्रक्रिया कापड शूजसाठी सर्वोत्तम असेल. यासाठी 1 चमचा लिक्विड डिशवॉशर गरम पाण्यात मिक्स करावे. यानंतर शूज या मिश्रणात बुडवावे आणि नंतर ब्रशने डाग साफ करावे. 

White Shoes Cleaning Tips
Secret of Happy Marriage: नवऱ्याने बायकोला चुकूनही सांगू नयेत 'या' 4 गोष्टी
  • टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर करून तुम्ही शूज देखील स्वच्छ करू शकता. कापडी शूज स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फक्त जुन्या टूथब्रश आणि पेस्टचा वापर करू शकता. यासाठी सर्वात पहिले शूज कापडाने स्वच्छ करावे आणि ते ओले केल्यानंतर, टूथब्रशने पेस्ट लावावी. 10 मिनिटे असेच राहू द्या आणि पुन्हा टूथब्रशने घासून नंतर पाण्याने धुवावे. तुमचे शूज नव्यासारखे चमकतील.

  • लिंबाचा रस

लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड शूज स्वच्छ करण्यास मदत करते. चपलांचा वास देखील दूर करते. यासाठी थंड पाणी घ्यावे. नंतर त्यात एक लिंबू पिळून चांगले मिक्स करावे. यानंतर हे मिश्रण पांढऱ्या शूजवर लावावे आणि नंतर ते हलक्या हाताने घासावे. 10 मिनिटांनी पाण्याने धुवून उन्हात वाळवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com