Vastu Tips For Main Door: वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हे फक्त तुमच्यासाठी प्रवेशद्वार नसून तुमच्या घरातील सर्व चांगल्या ऊर्जांचे प्रवेशद्वार आहे. हे घराच्या आतील आणि बाहेरील भागांना जोडणारे क्षेत्र आहे.
वास्तूनुसार मुख्य दरवाजाची दिशा सूचित करते की ही अशी जागा आहे जिथून घरामध्ये सौभाग्य आणि आनंदाचा प्रवेश होतो. घराच्या मुख्य दरवाजाबाबत वास्तूमध्ये काही टिप्स देण्यात आल्या आहेत. या उपायांचे पालन केल्यास लक्ष्मी घरात राहते. या वास्तु उपायांनुसार घराच्या मुख्य दारावर काही गोष्टी चुकूनही ठेवू नयेत. जाणून घेऊया सविस्तर.
घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही कचरा ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. तुमच्या मुख्य दरवाजाबाहेर घाण असेल तर घरात आर्थिक समस्या निर्माण होतात.
घराच्या मुख्य दरवाजावर विजेचे खांब किंवा तारा असू नयेत, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शक्य असल्यास घराचा मुख्य दरवाजा एका कोपऱ्यात लावा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा थेट परिणाम होणार नाही. घराचा उंबरठा दोन इंच वर केल्याने फायदा होतो.
शूज आणि चप्पल घराच्या मुख्य दारात ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी घराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करते. चप्पल तिथे ठेवल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते आणि घरात धनहानी होते.
अनेकदा लोक मुख्य दरवाजावर मनी प्लांट लावतात. पण वास्तूनुसार मनी प्लांट मानला जातो घराबाहेर लावल्याने घराची आर्थिक स्थिती खराब होते.
झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे ते कधीही मुख्य दरवाजाजवळ ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार कोणी झाडूकडे पाहू नये. ते अशा ठिकाणी ठेवा की जेथून बाहेरील कोणीही पाहू शकणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.