Vastu Tips: निखळ आनंदासाठी घरात फक्त 'हे' छोटे बदल करा

वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केल्यास, व्यक्तीच्या जीवनातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतात
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केल्यास, व्यक्तीच्या जीवनातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होतात आणि त्यांच्या आयुष्यात देखील सकारात्मक बदल होतात, असे मानले जाते. घराच्या बांधकामाव्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरात काही छोटे बदल केल्यास, घरात सुख-समृद्धी कायम राहते, तसेच जीवनात आनंद निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे बदल...

Vastu Tips
EMC Pune: तीन प्रकल्प बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रकल्पाला केंद्राची मंजूरी; 5,000 रोजगार निर्मितीचे लक्ष्य

देवघर

वास्तुशास्त्रानुसार देवघराला खूप महत्त्व आहे. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. तसेच, देवघराच्या वर किंवा खाली जिना किंवा स्नानगृह नसावे याची विशेष काळजी घ्यावी.

स्वच्छता

वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील धूळ आणि कोळ्याचे जाळे नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासोबतच बाथरूम देखील स्वच्छ असले पाहिजे, अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Vastu Tips
Goa Corona Update: बाधितांच्या संख्येत वाढ डिस्चार्ज घटले; सक्रिय रूग्णसंख्या पुन्हा शंभरीपार

प्रवेशद्वार

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावे. दार उघडताना आणि बंद करताना कुठलाही आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी.

कापूर जाळणे

वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि घराचे वातावरण शुद्ध होते.

झोपण्याची दिशा

वास्तुशास्त्रानुसार झोपताना कधीही दक्षिण दिशेला पाय ठेवू नयेत. असे केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com