EMC Pune: तीन प्रकल्प बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रकल्पाला केंद्राची मंजूरी; 5,000 रोजगार निर्मितीचे लक्ष्य

यामुळे 5,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.
EMC Pune
EMC PuneDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती उद्योग बळकट करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) ला मान्यता दिली आहे. पुण्याजवळील रांजणगाव फेज III येथे 492.85 कोटी रुपयांचा हा प्रकल्प होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने यासाठी सोमवारी मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रातून तीन मोठे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर हा मोठा प्रकल्प राज्यात येणार आहे. यामुळे 5,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.

EMC Pune
Goa Corona Update: बाधितांच्या संख्येत वाढ डिस्चार्ज घटले; सक्रिय रूग्णसंख्या पुन्हा शंभरीपार

इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली आहे. चंद्रशेखर म्हणाले, "नोएडा, तिरुपती, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे आधीपासूनच EMCs आहेत. रांजणगाव, पुणे येथील EMC मध्ये 2000 कोटी पेक्षा अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. भविष्यात येथे 5,000 हून अधिक लोकांसाठी रोजगारसंधी उपलब्ध होईल."

"लेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय राज्यातील सेमीकंडक्टर डिझाईन स्टार्टअपला बळ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी 1000 कोटींच्या सेमिकॉन इंडिया फ्यूचर डिझाइन कार्यक्रमाला चालना देण्याची सरकार योजना आखत आहे. लवकरच रोड शोसाठी महाराष्ट्राला भेट देणार असल्याची घोषणाही यावेळी चंद्रशेखर यांनी केली. यासाठी सी-डॅक, पुणे हे नोडल कार्यालय असेल," अशी माहिती त्यांनी दिली.

EMC Pune
Hansika Motwani Wedding: हंसिकाला मिळाला सपनों का सौदागर! 4 डिसेंबरला घेणार सात फेरे

"2014 मध्ये भारतीयांनी वापरलेल्या मोबाईल फोनपैकी 92 टक्के आयात केले होते. आता भारतीय वापरत असलेल्या मोबाईल फोनपैकी 97 टक्के देशांतर्गत उत्पादित केले जातात. 2014 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात देशाची शून्य निर्यात होती, सध्या 70,000 कोटी रुपयांची उपकरणे देश निर्यात करतो," अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com