Microwave Hacks: केवळ बेकिंगसाठी नाही, तर किचनमध्ये कित्येक गोष्टींसाठी कामी येतो मायक्रोवेव्ह! जाणून घ्या ट्रिक्स

मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ लवकर शिजते. तसेच याचा वापर करून अनेक कामे देखील सहज करता येते.
Microwave Hacks
Microwave HacksDainik Gomantak
Published on
Updated on

Microwave Hacks: अनेक घरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. यामुळे स्वयंपाकाला वेळ कमी लागतो. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ लवकर शिजते. तसेच याचा वापर करून अनेक कामे देखील सहज करता येते. ही कामे कोणती आहेत हे जाणून घेऊया.

Garlic
Garlic Dainik Gomantak
  • लसूण सोलण्यासाठी

लसूण सोलण्यासाठी अनेकांना खुप वेळ लागतो. मायक्रोवेव्हचा वापर करून लसूण सोलू शकता. यासाठी लसूण टिश्यूमध्ये ठेवावा आणि १० सेकंद गरम करावे. नंतर लसूण सोलण्यास सोपे होते.

Microwave Hacks
Liver Transplant केल्यानंतर करा 'या' 5 सोप्या गोष्टी
onion
onionDainik Gomantak
  • कांद्याचा तिखटपणा कमी होतो

कांदा कपतांना डोळ्यात पाणी येते. हे टाळायचे असेल तर तुम्ही कांदा मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. यासाठी कांदा दोन्ही बाजूने कापावा. नंतर २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा. कांद्यामध्ये असलेले रसायन कमी होतात, त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येत नाही.

Ghee
Ghee Dainik Gomantak
  • तूप बनवण्यासाठी

तुम्हीही घरी तूप बनवत असाल तर मायक्रोवेव्हचा वापर करू शकता. यासाठी एका मोठ्या काचेच्या डब्यात साय टाकावी आणि मायक्रोवेव्हमध्ये ६-७ मिनिट ठेवावे. तूप तयार होईल.

fruits Juice
fruits JuiceDainik Gomantak
  • फळांचा पुर्ण रस काढण्यासाठी

संत्रा, मोसंबी सारख्या फळांचा रस काढण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्हचा लापर करू शकता. यासाठी कोणतेही फळ १० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. यामुळे त्यातील फायबर कमी होऊन पुर्णपणे फळांमधून रस निघतो.

mataki, rajma
mataki, rajmaDainik Gomantak

जर तुम्ही रात्री मटकी, चवळी किंवा राजमा भिजवायला विसरे असाल तर मायक्रोवेव्हचा वापरू शकता. यासाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात ते भिजवावे. नंतर चिमूटभर बेकिंग सोडा टाकावे. नंतर10 मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com