प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यशस्वी (Success) व्हावे असे वाटते. पण अथक परिश्रम करून सुद्धा अपेक्षित यश किंवा करियरमध्ये (Career) प्रगती होत नाही.यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार (Negative thoughts) येतात. याचा परिणाम आपल्या कामावर होतो. याचे कारण आपली मेहनत कमी पडत नसून वास्तु दोष (Architectural defects) असू शकते. ज्यामुळे आपल्याला करियरमध्ये (Career) यश मिळत नाही. चला तर मग आज जाणून घेवूया वास्तूच्या अशाच काही टिप्सबद्दल.
* आपल्या कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. ज्या टेबलवर काम करतो ते स्वच्छ ठेवावे. जास्त पसारा असल्यास मानसिक गोंधळ निर्माण होऊन चिडचिड होते. यामुळे कामावरून लक्ष विचलित होते.
* करियरमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये बसण्याची जागा एक निश्चित करावी. ज्या ठिकाणी ऑफिसचे काम करायला बसतो त्यामागे भिंत असावी. कारण आपल्याला एक आधार मिळतो आणि नवीन जवाबदारी घेण्याची भीती राहत नाही.
* आपल्या ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी काम करतो तिथे काटेरी झाडे ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार आपल्या करियरमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
* करियरमध्ये यश मिळवण्यासाठी हिंसक प्राण्यांचे चित्रे ऑफिसमध्ये लावू नये. कारण यामुळे ऑफिसमधील सहकारी किंवा बॉससोबत तणाव निर्माण होऊ शकतो.
* घरात किंवा ऑफिसमध्ये पाण्यात बुडणाऱ्या जहाजाचे चित्र लावणे टाळावे. कारण आपल्यामध्ये नकारात्मक विचार वाढू शकतात.
* वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरात जेथे काम करता तेथे ताज्या फुलांचा फ्लॉवरपॉट ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच आपल्याला प्रसन्न देखील वाटते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.