Priyanka Deshmukh
ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये दोष आहे,अशा लोकांनी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी. घरातील कोणताही सदस्य जर अस्वस्थ असेल तर शेणापासून गणपती बाप्पांची मूर्ती बनवावी आणि त्याची पूजा करावी. यामुळे घरात सुख शांती नांदते.
जर घरात वास्तु दोष असेल तर सिंदूर आणि तूप मिक्स करून घरातील त्या भागात स्वतिक बनवावा. असे केल्यास घरातील वास्तु दोष दूर होतो.
गणपती बाप्पांची पूजा करतांना लाकडाच्या पाटावर लाल किंवा पिवळे रंगाचे कपडे घालून करावी, कारण गणपती बाप्पांला लाल आणि पिवळा रंग प्रिय आहे.
गणपती बाप्पांची पूजा करतांना पूर्व किंवा उत्तर दिशेने बसावे. गणपती बाप्पांची पूजा करतांना हळद, कुमकुमने तिलक लावावा. जास्वंदाचे फूल गणपती बाप्पांला प्रिय आहे. तसेच गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते कारण गणपती बाप्पांला दूर्वा प्रिय आहे.
गणपती बाप्पांची मूर्ती घराच्या मुख्या प्रवेश द्वारावर ठेवणे शुभ मानले जाते. स्फटिकपासून तयार केलेली मूर्ती वास्तु दोष दूर करण्यासाठी प्रभावी मनाली जाते. तसेच हळदीपासून तयार केलेली गणपती बाप्पांची मूर्ती खूप शुभ मानली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.