Vastu Tips For Home
Vastu Tips For Home Dainik Gomantak

Vastu Tips For Home: बाथरूममध्ये 'या' दिशेला ठेवा मीठ ठेवल्यास मिळतील चमत्कारी फायदे

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये मीठ ठेवल्यास दुर होतील अर्थिक समस्या
Published on

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. तसेच त्याचा चांगला परिणाम हा घरातील सदस्यांवर देखील होतो. अनेकदा घरातील वास्तुदोषाचा सदस्यावर देखील होतो.

वास्तुशास्त्रानुसार घरातील बाथरूममध्ये मीठ ठेवल्यास अनेक चमत्कारी फायदे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार की माठाचा वापर कसा करावा.

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये एका बाऊलमध्ये मीठ ठेवल्यास त्याचे आश्चर्यकारक फायदे होतात. वास्तुनुसार बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात रॉकसॉल्ट ठेवल्याने नकारात्मकता दूर होते असं सांगितलं गेलं आहे.

खाऱ्या पाण्याने आंघोळ करणेही वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरातील पैशाची कमतरता दूर होते. यामुळे घरात सुख-शांती नांदते. यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Vastu Tips For Home
Monsoon Tips: पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? वापरा 'या' 5 ट्रिक्स

पाण्याने भरलेल्या काचेच्या बाऊलमध्ये मीठ मिक्स केल्यास आणि बाथरूमच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावे. असे केल्याने पैशा संबंधिक समस्या दूर होतील.

बाथरूमशी संबंधित कोणतेही वास्तू दोष दूर करण्यासाठी पितळ्याच्या भांड्यात मीठ ठेवावे. ही वाटी अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला कोणाचाही स्पर्श होणार नाही. तसेच त्यातील मीठ बदलत राहावे.

टॉयलेटमध्ये खडे मीठ टाकून ते फ्लश केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.

तसेच मंगळवारी किंवा शनिवारी बाथरूममध्ये मीठ ठेवणे शुभ मानले जाते. मंगळवारी हनुमानजींच्या नावाने बाथरूममध्ये मीठ ठेवल्यास घरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून सरंक्षण होते. दुसरीकडे शनिवारी शनिदेवतेचे नाव घेताना बाथरूममध्ये मीठ ठेवल्यास शनिदेवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com