Home Remedies For Fruit Fly: पावसाळा सुरू झाला असून तो आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराबरोबरच घराची स्वच्छता राखणे गरजेचे असेत. या गोष्टीची काळजी न घेतल्यास घरात अनेक छोटे किडे, माशा वाढू लागतात आणि ते अन्नपदार्थांनवर बून रोगराई पसरवतात.
या व्यतिरिक्त या हंगामातील खाद्यपदार्थांना भुंग्यापासून सर्वाधिक धोका असतो आणि त्यांना कोणतेही उघडे खाद्यपदार्थ आढळल्यास ते त्यावर घिरट्या घालू लागतात. अशावेळी, जर तुम्हाला कीटक आणि माशा घरापासून दूर ठेवायचे असतील, तर तुम्ही हे सोपे उपाय ट्राय करू शकता.
दालचिनी
घरातून मासा घालवण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडर पाण्यात मिक्स करून स्वयंपाकघरात फवारणी करू शकता. थोड्या वेळातच माशा नाहीसे होतील आणि दालचिनीचा प्रभाव होईपर्यंत ते पुन्हा येणार नाहीत.
काळी मिरीचा वापर
जर माशा खाद्यपदार्थ किंवा फळांजवळ मोठ्या प्रमाणात वाढले असतील तर त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी काळी मिरी हलकी बारीक करून सुती कापडात बांधून पदार्थांजवळ ठेवावी. काळ्या मिरीच्या वासामुळे झुरळ देखील होत नाही.
कडुलिंबाचे तेल वापरावे
फळे (Fruits) किंवा अन्नावरील गूंजणारे बीटल दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल वापरू शकता. यासाठी फळांना अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून त्यावर थोडे कडुलिंबाचे तेल शिंपडावे.
अन्नपदार्थ झाकून ठेवावे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थ चांगले झाकून ठेवणे खूप गरजेचे आहे. याशिवाय कापलेल्या भाज्या आणि फळं उघडी ठेवू नका, यामुळे किचनमध्ये माशा वेगाने वाढू लागतात. यामुळे फळं खाण्याआधीच चिरावे आणि लगेच खाऊन संपवावे.
डस्टबीन नेहमी साफ ठेवावी
पावसाळ्यात डस्टबिन रोज स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये जास्त वेळ कचरा घरात ठेवू नका. तसेच, स्वयंपाकघरात कचरा भरलेले डस्टबिन ठेवणे टाळावे. कारण घरात माशा वाढू शकतात.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.