Office Vastu Tips: ऑफिसमध्ये टेबलवर ठेउ नका 'या' वस्तू

वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसमध्ये कोणत्या वस्तू ठेवल्यास प्रगती होउ शकते हे जाणून घेउया.
Office Vastu Tips:
Office Vastu Tips:Dainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips For Office: तुम्हाला नोकरीत यश मिळवायचे असेल तर वास्तूशातस्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. पण कधी कधी त्यांच्या छोट्या-छोट्या चुकांमुळे जीवनात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. परिणामी त्यांना कामाच्या ठिकाणी वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. इंक्रिमेंट होउ शकत नाही. पैशाची (Money) समस्या वाढू लागते. आर्थिक समस्याही वाढु लागतात. या समस्यावर उपाय म्हणून वास्तुशास्त्राचे असे काही नियम आहेत, जे आपण जाणूनबुजून किंवा नकळत टाळतो. अॉफिसमध्ये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

  • टेबलवर बसून जेवण टाळा

    ऑफिसच्या टेबलवर जेवण करणे अशूभ मानले जाते. वास्तूनुसार असे करणे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्याने आपल्या एकाग्रता आणि कार्यशैलीमध्ये अडथळे निर्माण होतात.

  • झपकी घेणे

    अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोक थोडा आराम करण्यासाठी अॉफिसमध्ये टेबलवर डोकं ठेवून पॉवर डुलकी घेतात. वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे. टेरेस किंवा बाहेर थोडावेळ फेरफटका मारणे किंवा चहा-कॉफी (Tea-Coffee) ने थकवा दूर करणे चांगले आहे.

Office Vastu Tips:
Curry Leaves Hair Mask ने मिळवा काळे, दाट केस
  • काटेरी झाडे

    काही लोक ऑफिसच्या टेबलवर शोभण्यासाठी झाडे ठेवतात. तुमच्या आजूबाजूला झाडे असणे चांगले आहे, पण ऑफिसच्या टेबलवर कधीही काटेरी झाडे ठेवू नका. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये वाद, तणावाची (Stress)परिस्थिती निर्माण होते.

  • ड्रॉवरमध्ये काय ठेउ नये

    ऑफिसच्या टेबलमध्ये ड्रॉवरची सोय असल्यास त्यात काही गोष्टी ठेवणे टाळा. त्यात कधीही वीजबिल, खाण्याचे बिल किंवा खर्चाची यादी ठेवू नका. पर्समध्येही या गोष्टी ठेवणे टाळावे.

  • या चूकाही करू नका

    ऑफिसमधील (Office) टेबलवर कधीही कचरा करू नका. या टेबलवर कधीही वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा संपूर्ण करिअरवर परिणाम करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com