Vastu Tips For Gift: लोकांना चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

वास्तुशास्त्रानुसार पाय आणि चप्पल यांना खूप महत्त्व देण्यात आले आहे. पायाचे रक्षण करण्यासाठी शूज घातले जात असले तरी हे गिफ्ट म्हणून कोणालाही देऊ नका.
Shoes
ShoesDainik Gomantak

Vastu Tips For Gift: वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास तर घरात सुख-समृद्धी येते आणि आर्थिक समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रात शूजला खूप महत्त्व आहे. अनेक लोक याला पादुका असेही म्हणतात. असे मानले जाते की शूज एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतात. शूजची काळजी, साफसफाई आणि पॉलिशिंगकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला आयुष्यात यश मिळते.

  • स्वच्छता

शूज पॉलिश करून किंवा ब्रश करून स्वच्छ केले तर माणसाचा अहंकार नष्ट होतो. बाहेरून आल्यावर शूज एका जागी व्यवस्थित ठेवावे. शूज घरात वापरायच्या वेगळ्या आणि बाहेरच्या वेगळ्या ठेवाव्या.

  • समस्या


शूज कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व दर्शवतात. पादुका हा शब्द पदापासून बनला आहे. जे लोक त्यांच्या पायांची काळजी घेतात ते निःसंशयपणे उच्च पदांवर आपली जागा मिळवतात. यामुळे तुम्ही जर पायाची काळजी घेतली नाही तर शूज तुमच्या मार्गातील अडथळा बनु शकतात.

Shoes
Matar Makhana Recipe: मटर पनीर खाऊन बोर झालात? मग ट्राय करा मटर मखाना, लगेच नोट करा रेसिपी
  • गिफ्ट

वास्तुशास्त्रानुसार शूज गिफ्ट म्हणून देणे अशुभ मानले जाते. यामुळे कोणाकडूनही शुज गिफ्ट म्हणून घेऊ नये किंवा कोणाला देऊ नये.  

शूज रॅकमध्ये ठेवावेत आणि दररोज फक्त स्वच्छ धुतलेले मोजे घालावेत. 

नवीन शूज घालून कोणाच्या अंत्यविधीला जाऊ नये असे करणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते.

नेहमी तुमच्या स्वतःच्या आकाराचे बूट घालावे. मोठे किंवा लहान नसावे. 

पायांना आरामदायी वाटणारेच शूज घालावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com