Valentine's Day Special: नातं होईल अधिकच घट्ट! गोडवा वाढवणाऱ्या 'Hug Day' चे 'हे' फायदे आरोग्यदायी

व्हॅलेंटाइन वीकचा आज सहावा दिवस आहे.
Valentine's Day Special
Valentine's Day SpecialDainik Gomantak
Published on
Updated on

valentines day 2023 know more what importance hug day

हॅलेंटाइन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. या वीकच्या प्रत्येक दिवशी काहीतरी खास दिवस असतो. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी हग डे म्हणून साजरा केला जातो. हग डेला खूप महत्त्व आहे आणि तो खूप खास मानला जातो.तेसच हग केल्याचे अनेक फायदे देखील आहेत.

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्ताला मीठी मारणे म्हणजे यासारखे दुसरे सुख नाही. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्याने प्रेम आणि विश्वास वाढतो असे म्हणतात. तसेही प्रेमाने मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसाची गरज नसते, पण आजचा दिवस खुप खास आहे. 'Hug Day' च्या निमित्ताने मिठी मारण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेउया.  

  • आपल्या पार्टनरला रोज हग करावे

पार्टनरला रोज मिठी मारल्याने स्ट्रेस कमी होतो. पार्टनरला 20 सेकंद मिठी मारल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात.

  • स्ट्रेस कमी होतो

तुम्हाला जर कधी जास्त स्ट्रेस जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या पार्टनरला मिठी मारू शकता. तुमच्या पार्टनरला मिठी मारणे तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुमचा ताण कमी झाल्याने तुमचा मूडही चांगला राहतो. 

Valentine's Day Special
Promise Day: तुमच्या पार्टनरला द्या 'ही' वचने, आयुष्यभर नात्यात राहिल गोडवा
Hug Day 2023
Hug Day 2023Dainik Gomantak
  • रक्तदाब कमी

तुम्हाला माहित नसेल पण 10 मिनिटे हात धरण्यापासून ते 20 सेकंद मिठी मारण्यापर्यंत तुमच्या रक्तदाबाची पातळी कमी होते. म्हणूनच मिठी हे रोमँटिक तसेच हृदयाच्या (Heart) आरोग्यासाठी चांगली मानली जाते. 

  • शरीरातील वेदना कमी होण्यास मदत मिळते

जर तुम्हाला कुठेतरी वेदना होत असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे वेदना कमी होतात.

  • मनातील भीती कमी

आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने तुमच्या मनातील भीती कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com