बैठ्या आसन प्रकारांपैकी वक्रासन हा एक प्रकार आहे. हे आसन केल्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळेच वक्रासन करण्याचे फायदे कोणते ते पाहुयात. (Vakrasana removes many physical complication)
वक्रासन करण्याचे फायदे -
१. मधुमेहींसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.
२. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.
३. मानसिक स्थैर्य मिळते. मानसिक ताण कमी होतो.
४. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
५. फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या पेशींचं कार्य सुरळीत होतं.
६. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवते.
७.पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते.
८. पाठीचा कणा मजबूत होतो.
९. खांदेदुखी, अस्थमा आणि पचनक्रिया यांच्याशी संबंधित तक्रारी दूर होतात.
१०. एकाग्रता वाढते.
वक्रासन कसं करावं?
१. प्रथम दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसावं.
२. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा.
३. डावा पाय सरळ ठेवा, उजवा हात पाठीमागे ठेवा
४. हळूहळू डावा हात उचलून तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवा. त्यानंतर तुमचा खांदा, मान मागे वळवून मागे पहा. किमान १० सेकंद या स्थितीत राहा आणि दुसऱ्या बाजूने हेच करा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.