फॅन्सी होम डेकोरसाठी 'असा' करा जुन्या साड्यांचा वापर

परंतु आजच्या युगात कपड्यांचा ट्रेंड (Trends) वेगाने बदलत आहे
जर साडीचा रंग चमकदार असेल आणि त्यावर उत्तम डिझाईन केलेली असेल तर त्यापासून तुम्ही लांब जॅकेट बनवता येईल.
जर साडीचा रंग चमकदार असेल आणि त्यावर उत्तम डिझाईन केलेली असेल तर त्यापासून तुम्ही लांब जॅकेट बनवता येईल.Dainik Gomantak
Published on
Updated on

एक काळ असा होता की एकदा एक खूप किमतीची साडी (sarees) खरेदी केल्यानंतर ती अनेक समारंभात घातली जात होती . परंतु आजच्या युगात कपड्यांचा ट्रेंड (Trends) वेगाने बदलत आहे. तसेच स्पर्धा देखील वाढालीऊ आहे. आजकाल लोक लग्नाच्या निमित्ताने, लग्नानंतर किंवा कौटुंबिक सोहळ्यानिमित्त साडी (sarees) नेसून फोटो काढतात. परंतु पुन्हा ती साडी परिधान करावी वाटत नाही. यानंतर वॉर्डरोबमध्ये तर साड्यांचा ढीगच लागतो. महागड्या किंमती असलेल्या या साड्या घालता आल्या नाहीत आणि काढल्या जात नाहीत. जर तुमच्या बाबतीत देखील असेच असेल तर तुम्ही या साड्यांचा पुन्हा वापर करू शकता. यासाठी असे काही मार्ग आहेत. अशा परिस्थितीत , कोणालाही अंदाज देखील येत नाही आणि लोक तुमच्या क्रिएटिविटीचे (Creativity) कौतुक करतील.

जर साडीचा रंग चमकदार असेल आणि त्यावर उत्तम डिझाईन केलेली असेल तर त्यापासून तुम्ही लांब जॅकेट बनवता येईल.
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

- लहंगा चोळी

जर साडी बनरसी , रेशीम किंवा जड डिझाईनची असेल तर सर्वात सोपी कल्पना अशी की आपण त्यापासून लहंगा आणि चोळी बनवू शकतो. पार्टीला जातांना त्या साडीसाठी ब्लाउजकरिता वेगळा कापड घेऊन शिवल्यास एक नवीन पोशाख तयार होऊ शकतो.

- लांब जाकेट

जर साडीचा रंग चमकदार असेल आणि त्यावर उत्तम डिझाईन केलेली असेल तर त्यापासून तुम्ही लांब जॅकेट बनवता येईल. हे जॅकेट तुम्ही पुन्हा कोणत्याही कार्यक्रमात जातांना स्कर्ट, जीन्स कोणत्याही ड्रेसवर घालू शकता. हे दिसेल युनिक असते.

- फॅब्रिक वॉल पेंटिंग

आपण घरातील ड्रॉईंग रूम सजवण्यासाठी देखील या साड्यांचा वापर करू शकतो. विविध प्रकारच्या साड्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या आकाराची फॅब्रिक वॉल पेंटिंग तयार करून घर सजवू शकतो. हे देखील दिसेल खूप युनिक वाटेल.

जर साडीचा रंग चमकदार असेल आणि त्यावर उत्तम डिझाईन केलेली असेल तर त्यापासून तुम्ही लांब जॅकेट बनवता येईल.
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

- कुशन कव्हर्स

आजकाल सोफ्याचवर रंगीबेरंगी कुशन कवर ठेवण्याचा ट्रेंड आहे. आपण प्रिंटेड साड्या किंवा वर्क असलेल्या साड्यामधून कुशन कव्हर्स बनवू शकता. हे आपण घरातील सजावटीसाठी वापरू शकतो.

- लॉन्ग स्कर्ट

आजकाल लॉन्ग स्कर्टची खूप फैशन आहे. अशावेळी आपण आपल्या साडीमडून स्कर्टची डिझाईन बनवू शकता. तसेच त्यासोबत उत्तम जुळणारी कुर्ती आणि क्रॉप टॉप देखील बनवता येईल .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com