Urinary Infection: उन्हाळ्यात का वाढतो यूरिन इंफेक्शनचा धोका? काय आहेत सुरुवातीची लक्षणे अन् कारणे? जाणून घ्या

Summer Urinary Tract Infection Causes: उन्हाळ्यात यूरिनरीट्रॅक्ट इंफेक्शनचा (UTI) धोका वाढतो. यामागे अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डिहायड्रेशन. उन्हाळ्यात यूरिन उत्पादन कमी होते त्यामुळे बॅक्टेरियांना वाढण्याची संधी मिळते.
Summer Urinary Tract Infection Causes
Urinary InfectionDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्यात यूरिनरीट्रॅक्ट इंफेक्शनचा (UTI) धोका वाढतो. यामागे अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डिहायड्रेशन. उन्हाळ्यात यूरिन उत्पादन कमी होते त्यामुळे बॅक्टेरियांना वाढण्याची संधी मिळते. याशिवाय, उन्हाळ्यात यूटीआय होण्याची इतरही अनेक कारणे आहेत. त्यामुळे यूटीआयची लक्षणे ओळखून उपचार घेणे गरजेचे ठरते. जर UTI वर वेळेवर उपचार केला नाही तर हा संसर्ग गंभीर होऊ शकतो, ज्यामुळे यूरिन ब्लॅडर आणि यूरिन ट्रॅकचे गंभीर नुकसान होऊ शकते.

यूटीआय म्हणजे मूत्रमार्गात होणारा संसर्ग. या संसर्गामुळे लघवी करताना जळजळ आणि असह्य वेदना होतात. एवढचं नाही तर जर UTI असेल तर मूत्रमार्गात नेहमीच थोडीशी जळजळ आणि वेदना होते आणि लघवी करताना ती वाढते. यूटीआय केवळ मूत्रमार्गावरच नाही तर मूत्राशय आणि मूत्रपिंडांवरही परिणाम करते. जर या आजारावरील उपचारास उशीर झाला तर मूत्रपिंडाला गंभीर हानी पोहोचू शकते.

Summer Urinary Tract Infection Causes
Heart Surgery: हृदय शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची कशी घ्यायची काळजी? आहार कसा ठेवायचा अन् कोणत्या चुका टाळायच्या? जाणून घ्या तज्ञांकडून

यूटीआयची कोणती कारणे आहेत?

यूटीआयचे मुख्य कारणे म्हणजे डिहायड्रेशन. याशिवाय, घाणेरड्या शौचालयात लघवी करणे आणि बराच वेळ लघवी रोखून ठेवणे ही देखील त्याची कारणे आहेत. या आजारात तहान लागत नाही, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डिहायड्रेशनमुळे यूटीआय होतो. तसेच, जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने यूटीआय होऊ शकतो. घाणेरड्या शौचालयात लघवी केल्याने देखील हा संसर्ग लगेच होतो. म्हणून या तिन्ही परिस्थितींपासून सावध राहिले पाहिजे. शौचालय स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच, लघवी 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ रोखून ठेवू नये.

Summer Urinary Tract Infection Causes
Heart Attack Prevention Tips: हृदयविकार टाळण्यासाठी आहारात काय बदल करावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

ही आहेत सुरुवातीची लक्षणे

यूटीआयच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे समाविष्ट आहे. यासोबतच लघवीचा रंगही बदलतो. लघवीचा घाण वास येतो. यूटीआयमुळेही ताप येतो. जेव्हा स्थिती गंभीर होते तेव्हा कंबरेत वेदना होतात. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधा आणि उपचार सुरु करा. उपचारांना उशीर केल्यास इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com