Liver Infection: यकृताच्या संसर्गाचे किती प्रकार आहेत? कोणती लक्षणे दिसतात? या जीवघेण्या आजाराचा 'या' लोकांना धोका जास्त

Types Of Liver infections: यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. ते सुरक्षित आणि निरोगी आपण ठेवले पाहिजे. यकृतामध्ये अनेक प्रकारचे संसर्ग होतात, परंतु मुख्यत: दोनच संसर्ग आहेत. या संसर्गांमुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होतो.
Non-Alcoholic Fatty Liver Disease
Fatty LiverDainik Gomantak
Published on
Updated on

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. ते सुरक्षित आणि निरोगी आपण ठेवले पाहिजे. यकृतामध्ये अनेक प्रकारचे संसर्ग होतात, परंतु मुख्यत: दोनच संसर्ग आहेत. या संसर्गांमुळे रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सुरुवातीच्या टप्प्यात संसर्गावर सहज उपचार करता येतात, परंतु जर संसर्गाने गंभीर रुप धारण केले तर उपचार करणे कठीण होते. चला तर मग यकृतामध्ये किती प्रकारचे संसर्ग होतात आणि त्याची सुरुवात कशी होते? याबाबत तज्ञांकडून जाणून घेऊया...

यकृताचे संसर्ग प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक संसर्ग विषाणूजन्य तर दुसरा जीवाणूजन्य. विषाणूजन्य संसर्गामुळे हिपॅटायटीस होतो तर बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे यकृतामध्ये सिस्ट तयार होतात. दोन्ही संसर्ग गंभीर आहेत. त्यामुळे यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे ठरते. हिपॅटायटीसचे पाच प्रकार आहेत. तर बॅक्टेरियाच्या संसर्गाचे अनेक प्रकार आहेत. दोन्ही संसर्गात सुरुवातीच्या टप्प्यात पोटदुखी, यकृताला सूज येणे आणि पचनक्रिया बिघडणे ही लक्षणे दिसून येतात. जर ही लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरु करावेत.

Non-Alcoholic Fatty Liver Disease
Liver Infection: त्वचेवर खाज सुटत असेल तर वेळीच सावध व्हा! लिव्हर इन्फेक्शननंतर दिसतात 'ही' लक्षणे, जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

यकृत खराब होण्याची गंभीर लक्षणे कोणती?

हिपॅटायटीस संसर्गाचे वर्गीकरण अ, ब, क, ड आणि ई या श्रेणींमध्ये केले जाते. यामध्ये यकृताला सूज येण्यासोबतच गंभीर हानी पोहोचते. सामान्यतः या संसर्गाला कावीळ असेही म्हणतात. काही हिपॅटायटीस संसर्ग बरे होतात, परंतु काही संसर्ग कायम राहतात, ज्यामुळे उपचार करणे कठीण होते. हिपॅटायटीस ए आणि ई ची लागण दूषित पाण्यामुळे होते तर हिपॅटायटीस बी आणि सी ची लागण रक्त आणि इतर शरीरातील द्रवपदार्थांमुळे होते. हिपॅटायटीस डीचा संसर्ग बी असलेल्या लोकांमध्ये होतो. याशिवाय, बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे यकृतामध्ये सिस्ट तयार होतात.

Non-Alcoholic Fatty Liver Disease
Urinary Infection: उन्हाळ्यात का वाढतो यूरिन इंफेक्शनचा धोका? काय आहेत सुरुवातीची लक्षणे अन् कारणे? जाणून घ्या

सुरुवातीचा संसर्ग कसा असतो?

यकृताच्या संसर्गात सुरुवातीला अनेकदा थकवा जाणवतो, जो पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही. संसर्गाची लागण झाल्यास भूक लागत नाही. तसेच, पोटदुखीचा त्रास सुरु होतो. याशिवाय, डोळे पिवळे पडतात. जर तुम्हाला अशाप्रकारची लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधून उपचार सुरु करा. संसर्गाचा प्रकार कळल्यानंतर उपचार सुरु करणे सोपे जाते. सुरुवातीच्या टप्प्यात सर्व प्रकारच्या यकृताच्या संसर्गावर उपचार शक्य आहेत, परंतु जर उपचारांना उशीर झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com