Tulsi Health Tips: तुळशीचे अतिसेवनही ठरु शकते धोकादायक, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

तुळशीला हिंदु धर्मातच नव्हे तर आयुर्वेदातही खुप फायदेशीर मानले गेले आहे.
Tulsi Health Tips
Tulsi Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Tulsi Health Tips: तुळशीला हिंदू धर्मातच नाही तर आयुर्वेदातही खूप फायदेशीर मानले गेले आहे. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असलेली वनस्पती मानले जाते. तुळशीला आयुर्वेदात अमृत म्हटले जाते. तुळशीचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, सर्दीपासून आराम मिळण्याबरोबरच रक्त गोठणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अशा अनेक आजारांपासून आराम मिळतो.

तुळशीचे सेवन आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही ते तुमच्यासाठी हानिकारकही ठरू शकते. त्यामुळे तुळशीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.  याबद्दल अधिक माहीती जाणून घेउया.

तुळशीच्या अतिसेवनामुळे आरोग्यास त्रास सहन करावा लागू शकतो

  • मधुमेह

हायपोग्लायसेमिक पातळी नियंत्रित करणारे घटक तुळशीच्या पानांमध्ये असतात. त्यामुळे तुळशीची पाने चघळल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. 

जर व्यक्तीची साखरेची पातळी आधीच कमी झाली असेल किंवा तो साखरेसाठी औषधे घेत असेल तर तुळशीचे जास्त सेवन करणे त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  • गर्भवती महिला

तुळशीमध्ये असलेले युजेनॉल हे महिलांमध्ये मासिक पाळी येण्याचे कारण असू शकते. तुळशीचे अधिक सेवन केल्याने गर्भधारणेदरम्यान जुलाब देखील होऊ शकतो. याच कारणामुळे गरोदरपणात महिलांना तुळशीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात नाही.

Tulsi Health Tips
Breakfast Recipe: रविवारची करा हेल्दी सुरूवात, ब्रेकफास्टमध्ये बनवा पालक उत्तपम
  • फर्टिलिटीवर  परिणाम होऊ शकतो

तुळशीचे जास्त सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते. तुळशीच्या अतिसेवनामुळे फलित अंडी गर्भाशयाला जोडण्याची शक्यता कमी होण्याचा धोका असतो.

  • जळजळ होणे

तुळशीचा गुणधर्म हा उष्ण असतो. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होउ शकतात. यामुळे तुळशीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

  • रक्तपातळ होण्याचा धोका

तुळशीच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात जे रक्त पातळ करतात. तुळशीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त पातळ होते, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com