Tropical Spice Plantation: ताजे मसाले खरेदी करायचे आहेत? थर मग गोव्यातील या मसाल्यांच्या शेतीला नक्की भेट द्या

Tropical Spice Plantation: फोंडा तालुक्यातील केरी येथे हा ट्रॉपिकल स्पाइस फार्म आहे.
Tropical Spice Plantation
Tropical Spice PlantationDainik Gomantak

Tropical Spice Plantation

ट्रॉपिकल स्पाइस हे राज्यातील प्रसिद्ध मसाल्यांच्या लागवडींपैकी एक फर्म आहे जिथे या क्षेत्राचा मार्गदर्शित दौरा करता येतो. या दौऱ्यात माहितीपूर्ण साइट टूर आणि शेतीतील ताजी उत्पादने आपल्याला मिळतात. याठिकाणी स्वादिष्ट व पारंपारिक सेंद्रिय जेवणाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.

फोंडा तालुक्यातील केरी येथे हा ट्रॉपिकल स्पाइस फार्म आहे. याठिकाणी पर्यटकांचे स्वागत हर्बल चहाने केले जाते आणि त्यानंतर ट्रॉपिकल स्पाइसचा मार्गदर्शित दौरा केला जातो. केळीच्या पानावर स्थानिक जेवण दिले जाते. येथील मार्गदर्शक मैत्रीपूर्ण आहेत. येथील लोकल मसाले देखील खरेदी करू शकता.

फोंड्यातील केरी मध्ये स्थित असलेले ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशन हा एक अनोखा अनुभव आहे याचा तुमच्या गोव्याच्या सहलीमध्ये नक्की अनुभव घ्या, फोंडापासून 6 किमी अंतरावर अंतरावर, ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशन आहे. हे ट्रॉपिकल स्पाइस गोव्यातील सर्वात जुन्या मसाल्यांच्या लागवडींपैकी एक आहे.

Tropical Spice Plantation
Vasco Police: भाड्याची कॅब घेऊन पळालेले हरियाणातील 'ते' दोघे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींना शिर्डी येथून केली अटक

केरी गावात ताजेतवाने व स्वच्छ वातावरण आहे आणि या प्रसिद्ध मसाल्याच्या बागांना भेट देताना तुम्हाला तेच मिळते. जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल, तर ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशनला नक्की भेट द्या मसाल्याच्या ‘जंगला’मध्ये तुम्हाला मसाल्यांच्या जगात आणि त्यांच्या औषधी गुणधर्म समजतील.

काळी मिरी, वेलची, जायफळ, व्हॅनिला, दालचिनी, लवंगा, मिरची, धणे हे मसाले त्यांच्या वनस्पती स्वरूपात पाहायला मिळतात.

याठिकाणी तुम्हाला शंभर वर्षांहून जुनी नारळाची झाडे, काजू, सुपारी नट पाम ट्री आणि स्टार फ्रूट, जॅकफ्रूट, कस्टर्ड ऍपल, केळी, पपई, अननस आणि बरेच काही पहायला मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com