Vasco Police: भाड्याची कॅब घेऊन पळालेले हरियाणातील 'ते' दोघे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींना शिर्डी येथून केली अटक

Vasco Police: दोन्ही आरोपींना गोव्यात आणून अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी देण्यात आली.
Vasco Police
Vasco PoliceDainik Gomantak

Vasco Police: गोव्यातून भाड्याची कॅब घेऊन पळून जाणाऱ्या आदेश कुमार राजेंद्र कुमार (वय 30 वर्ष, रा. हरियाणा) आणि मनोज मुल विशन सिंग (वय 29 वर्ष, रा. हरियाणा) या दोघांना पकडण्यात वास्को पोलिसांनी यश आलंस.

वाहन परत करण्याचे आश्वासन देणाऱ्या आरोपींचा शिर्डी येथील पीएसआय मयूर सावंत, संतोष भाटकर आणि नईम शेख यांच्या नेतृत्वाखालील टीमने शोध घेतला. बलेनो वाहन जप्त केल्यानंतर, आरोपींना गोव्यात परत आणण्यात आले व अटक केली आणि न्यायालयात हजर करण्यात आले.

ते सध्या दोन दिवसांच्या कोठडीत असून, चौकशी सुरू आहे. या प्रकरणी वास्को पोलिसांनी दोन जणांवर गैरव्यवहार प्रकरणी भादंस 406 गुन्ह्याखाली अटक केली.

शाहजहान मोहम्मद , सलीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आदेश कुमार राजेंद्र कुमार आणि मनोज विशन सिंग हे दोघेही हरियाणा येथील असून यांनी तक्रारदाराकडे ग्राहक म्हणून संपर्क साधला आणि मारुती सुझुकी बलेनो क्रमांक GA-06-T-6847 भाड्याने एक कार घेतली.

तक्रारदाराच्या मालकीचे चार दिवसांसाठी म्हणजे 3 मार्च ते 6 मार्च 2024 पर्यंत प्रतिदिन रु. 1,200/- भाड्याने चार दिवसांनी ते परत देण्याचे आश्वासन दिले परंतु ते वेळेत परत करण्यात अयशस्वी ठरला आणि तक्रारदाराने सोपवलेले वाहन परत न केल्याने वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली.

3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता साईबाबा मंदिराजवळ, वास्को येथे भाड्याने कॅब घेऊन पळून गेले. मयूर सावंत आणि संतोष भाटकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बारकाईने तपास केल्यानंतर, नईम शेख या आरोपीला शिर्डी येथे पकडण्यात आणि बलेनो वाहन जप्त करण्यात यश आले.

दोन्ही आरोपींना गोव्यात आणून अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com