Tricolor Vegetable: आरोग्याचे रहस्य भाज्याच्या रंगात; जाणून घ्या फायदे

रंगीबेरंगी भाज्यांपासून तुम्ही स्वादिष्ट पदार्थ बनवून आस्वाद घेऊ शकता.
Tricolor Vegetable
Tricolor VegetableDainik Gomantak
Published on
Updated on

Tricolor Vegetable: आजच्या धावपळीच्या काळात लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. निरोगी आणि दिर्घ आयुष्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे असते. जर तुम्हाला निरोगी आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर तिरंग्याच्या रंगाच्या भाज्यांचे सेवन करू शकता. यामुळे तुम्ही हेल्दी आणि फिट राहू शकता.

या भाज्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाणे लाभदायी ठरतात. या रंगीबेरंगी भाज्यांचे अनेक फायदे आहेत. या भाज्यापासून तुम्ही अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवू शकतात.

  • केशरी रंगाच्या भाज्या

केशरी रंगाच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि अनेक पोषक घटक असतात. निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते. यामुळे रोगप्रतिकारश्ती वाढण्यास मदत मिळते.डोळ्यांचे आरोग्य,हृदयविकार, कर्करोग यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. गाजर, भोपळा, संत्री यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

  • पांढऱ्या रंगाच्या भाज्या

पांढऱ्या रंगाच्या भाज्या आणि फळ दोन्हींचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते. या रंगाच्या भाज्या आणि फळ खाल्याने शरीरावर येणारी सुज आणि जळजळ कमी होण्यास मदत मिळते. तसेच कॉलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते. यासाठी तुम्ही केळी, बटाटा, लसूण, मशरूम यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

Tricolor Vegetable
Independence Day 2023: निरोगी आयुष्यासाठी 'या' 5 वाईट सवयींपासून स्वत:लाही करा स्वतंत्र
  • हिरव्या रंगाच्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. या हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच हिरव्या भाज्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. यासाठी आहारात पालक, ब्रोकोली, मेथी यासारख्या भाज्यांचा समावेश करू शकता.

  • कोणते पदार्थ बनवू शकता?

तुम्ही तिरंगा भाजी वापरून इडली, सँडविच,डोसा, कोशिंबिर,उतप्पा यासारखे पदार्थ बनवून स्वातंत्र्यदिनाचा आनंद घेऊ शकता. हे पदार्थ झटपट तयार होणारे असून आरोग्यदायी देखील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com