Tomato Price
Tomato PriceDainik Gomantak

Tomato Price: टोमॅटोशिवाय बनवु शकता टेस्टी भाज्या, लंच अन् डिनरसाठी परफेक्ट

टोमॅटोचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो.
Published on

Tasty Veggies Without Tomato Recipe: सध्या टोमॅटोचे भाव खुप वाढले आहेत. यामुळे अनेक लोक टोमॅटोचा वापर कमी केला आहे. पण तुम्ही टोमॅटोला पर्याय म्हणून काही गोष्टींचा वापर करू शकता. ज्यामुळे भाज्यांची चव अधिक वाढेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाज्या, ज्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात टोमॅटोशिवाय आरामात बनवता येतात.

  • भेंडीची भाजी

भेंडीच्या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. तुम्ही भेंडीची सुकी भाजी बनवू शकता किंवा दही घालून ग्रेव्ही बनवा. भेंडी बनवण्यासाठी टोमॅटो नसला तरी स्वादिष्ट भाजी बनवू शकता.

  • वांग्याची भाजी

भरल्या वांग्याची भाजी सुद्धा टोमॅटोशिवाय तयार होते. ही भाजी वरण भात आणि पोळीसोबत खायला चांगली लागते. दुपारचे जेवण असो वा रात्री भरलेले वांगे दोन्हीसाठी उत्तम आहे.

  • आलू कोबीची भाजी

फुलकोबीची भाजी बनवतांना बटाट्याला कांद्यासोबत फ्राय करून तयार केले जाते. ही ग्रेव्हीलेस भाजी बनवण्यासाठी टोमॅटोची गरज नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मुले खायला कंटाळा करत असतील तेव्हा बटाटा आणि कोबीची ही भाजी ट्राय करून पाहा.

Tomato Price
Happy Hormones: हॅपी हार्मोन्ससाठी 'या' गोष्टी फॉलो केल्यास राहाल आनंदी
  • आलू मटरची भाजी

मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील आलू मटरची भाजी खायला आवडते. ही भाजी टोमॅटो शिवाय सहज बनवता येते.

  • कोफ्ता

तुम्ही टोमॅटो शिवाय कोफ्तासाठी ग्रेव्ही बनवू शकता. कांदा आणि लसूण घालून रस्सा घट्ट करण्यासाठी भाजलेले बेसन वापरा. तसेच क्रीमच्या मदतीने कोफ्त्याची क्रीमी ग्रेव्ही बनवू शकता.

  • कारल्याची भाजी

कारल्याची भाजी बनवण्यासाठी टोमॅटोची गरज नाही. कारण तुम्ही ते भाजून किंवा तळून बनवू शकता. यासोबत बेसनासह मसाल्यांनी भरलेले चविष्ट भरलेले कारलेही चवदार लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com