Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Viral Infection In Children: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणातील ओलावा आणि अस्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.
Viral Infection In Children
Tomato FeverDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Infection In Children: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणातील ओलावा आणि अस्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. याच काळात लहान मुलांना, विशेषतः 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 'टोमॅटो फिव्हर' नावाच्या एका दुर्मिळ विषाणूजन्य संसर्गाचा (Viral Infection) धोका असतो. या आजाराला हे नाव त्याच्या विशिष्ट लक्षणांमुळे पडले आहे. या आजारात शरीरावर लाल आणि गोलाकार फोड येतात, जे दिसताना टोमॅटोसारखे दिसतात.

पावसाळ्यात या आजाराचा धोका वाढण्याची अनेक कारणे आहेत. या ऋतूमध्ये वातावरणात आर्द्रता आणि अस्वच्छता वाढते, ज्यामुळे डास आणि विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. शिवाय, पावसाळ्यात मुलांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देखील काही प्रमाणात कमकुवत होते, ज्यामुळे ते संसर्गाला लवकर बळी पडतात. शाळांमध्ये किंवा प्लेग्रुप्समध्ये मुलांचे एकत्र खेळणे, खेळणी, तसेच खाण्या-पिण्याच्या वस्तू एकमेकांसोबत शेअर करणे यामुळेही हा संसर्ग एका मुलाकडून दुसऱ्या मुलामध्ये सहज पसरु शकतो. म्हणूनच, पावसाळ्याच्या दिवसांत या आजाराविषयी अधिक सतर्क राहणे खूप गरजेचे आहे.

Viral Infection In Children
Heart Disease: चिंताजनक! हृदयविकार ठरला देशातील सर्वात मोठा 'किलर'; नव्या अहवालातून धक्कादायक खुलासा

शरीरावर दिसणारे परिणाम आणि तज्ज्ञांचा सल्ला

गाझियाबाद येथील जिल्हा रुग्णालयाच्या बालरोग विभागात कार्यरत असलेले डॉ. विपिन चंद्र उपाध्याय यांच्या मते, 'टोमॅटो फिव्हर' मुलांच्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करु शकतो.

  • हा ताप मुलांची ऊर्जा कमी करतो, ज्यामुळे त्यांना खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

  • शरीरावर येणाऱ्या लाल फोडांमुळे तीव्र जळजळ आणि खाज सुटते, ज्यामुळे मूल बेचैन होऊ शकते.

  • काही गंभीर प्रकरणांमध्ये हे फोड तोंडात आणि जिभेवरही येतात, ज्यामुळे मुलांना खाण्यापिण्यात मोठी अडचण येते.

  • सतत येणारा ताप आणि शरीरातील पाण्याची कमतरता (Dehydration) यामुळे मुलांना चक्कर येणे, डोकेदुखी आणि उलट्यांसारख्या समस्या येऊ शकतात.

जर या आजारावर वेळेत उपचार केले नाहीत, तर हा संसर्ग मुलांची रोगप्रतिकारशक्ती आणखी कमकुवत करतो. म्हणूनच, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला डॉक्टर देतात, जेणेकरुन या आजाराचा मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही.

टोमॅटो फिव्हरची लक्षणे आणि तपासणी

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील बालरोग विभागाचे माजी डॉ. राकेश बागडी सांगतात की, 'टोमॅटो फिव्हर'ची सुरुवातीची लक्षणे सामान्य सर्दी-खोकला किंवा व्हायरल तापासारखी वाटू शकतात, परंतु हळूहळू ती वेगळी ओळख दाखवू लागतात.

  • सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे तीव्र ताप, जो अनेकदा 101 ते 103 अंश फॅरेनहाइटपर्यंत वाढू शकतो.

  • यासोबतच शरीरावर, विशेषतः हात, पाय आणि तोंडाच्या आसपास लाल रंगाचे लहान लहान फोड किंवा छाले दिसू लागतात.

  • ताप आणि फोडांसोबतच मुलांना भूक न लागणे, सतत थकवा, चिडचिडेपणा आणि अशक्तपणा जाणवतो.

  • काही वेळा शरीरात तीव्र वेदना, सांधे दुखणे किंवा घसा खवखवणे अशा समस्याही दिसून येतात.

  • उलट्या आणि जुलाबासारख्या समस्यांमुळे संक्रमित मुलाला शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू शकते.

हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलामध्ये सहज पसरु शकतो, त्यामुळे वेळेवर याची ओळख पटवणे आणि आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Viral Infection In Children
Mental Health And Heart Disease: नैराश्य आणि ताणतणाव वाढवतात हृदयविकाराचा धोका; मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं

प्रतिबंधात्मक उपाय

'टोमॅटो फिव्हर'पासून बचाव करण्यासाठी पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  • मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या: मुलांना नियमित अंघोळ घालणे, हात स्वच्छ ठेवणे आणि त्यांना स्वच्छ कपडे घालणे महत्त्वाचे आहे.

  • लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा: मुलाला ताप किंवा फोड आल्यास वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • संक्रमित मुलाला वेगळे ठेवा: जर एखाद्या मुलाला टोमॅटो फिव्हरचा संसर्ग झाला असेल, तर त्याला इतर मुलांपासून काही दिवसांसाठी दूर ठेवा.

  • अस्वच्छतेपासून दूर ठेवा: मुलांना घाण पाणी किंवा दूषित वस्तूंपासून दूर ठेवा, कारण यातूनही संसर्ग पसरु शकतो.

  • पौष्टिक आहार आणि पाणी: मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार आणि पुरेसे पाणी द्या.

  • शाळेत वस्तू शेअर करणे टाळा: शाळेत किंवा प्लेग्रुपमध्ये मुलांना एकमेकांचे पेन, पेन्सिल, किंवा जेवण शेअर करु नये, असे शिकवा.

Viral Infection In Children
Heart Disease Goa: चिंताजनक! गोव्यात दररोज सापडताहेत हृदयरोगाचे 19 रुग्‍ण; सर्वाधिक संख्या 'या' भागामध्ये

एकंदरीत, 'टोमॅटो फिव्हर' हा एक दुर्लक्षित न करता येणारा आजार आहे. पालकांनी जागरुक राहून, सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटवून आणि वेळेत उपचार घेतल्यास या आजाराचा गंभीर परिणाम टाळता येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com