Toast Pizza Recipe
Toast Pizza RecipeDainik Gomantak

Toast Pizza Recipe: तव्यावर झटपट बनवा टोस्ट पिझ्झा

Easy Toast Recipe: मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही हा पिझ्झा देऊ शकता.
Published on

सकाळचा नाश्त्यासाठी सगळेचजण झटपट तयार होतील आणि हेल्दीही असतील अशा पदार्थांच्या शोधात असतात. अशीच एक रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टोस्ट पिझ्झा झटपट तयार होणारी रेसीपी आहे. मुलांना ही डिश खायला खूप आवडते. तसेच संध्याकाळच्या नाश्तात, टि-ब्रेकमध्ये आस्वाद घेउ शकता. लहान मुलांना बर्‍याचदा काही तरी वेगळंच खायचं असत. तुम्ही हा टोस्ट पिझ्झा (Toast Pizza) बनवून मुलांना देऊ शकता. चला तर जाणून घेऊया ही रेसिपी कशी बनवायची...

  • टोस्ट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • शिमला मिरची

  • कांदा

  • गाजर

  • टोमॅटो

  • कोथिंबीर

  • ब्रेड

  • पनीर

  • चीज

  • चवीनुसार मीठ

  • काळी मिरी पावडर

  • बटर

Toast Pizza Recipe
Fenugreek Seeds Benefits: हाय ब्लड शुगर कमी करण्यासाठी मेथी दाणे ठरतात उपयुक्त...
  • टोस्ट पिझ्झा तयार करण्याची पद्धत

  • सर्वात पहिले भाज्या धुवून बारीक चिरून घ्या.

  • नंतर आता तव्यावर ब्राऊन ब्रेड गरम करून घ्या. ब्रेड जास्त वेळ गरम करण्याची गरज नाही.

  • यानंतर त्यावर सॉस लावा.

  • पनीर किसून त्यावर टाका.

  • त्यावर बारिक चिरलेल्या भाज्या घाला.

  • चीज, मीठ, काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर घाला.

  • या तयार ब्रेडचा तुकड्याला आता तव्यावर पाच मिनिटे कडक होण्यासाठी एका प्लेटने झाकून ठेवा. यावेळी मंद आच ठेवा नाही तर ब्रेड जळून जाईल.

  • तुमची रेसिपी तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com