Fenugreek Seeds Benefits: हाय ब्लड शुगर कमी करण्यासाठी मेथी दाणे ठरतात उपयुक्त...

मेथीचे दाणे अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि खनिजांसह अनेक पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. ज्याचा वापर करून पचन आणि मधुमेहाच्या समस्येवर मात करता येते.
Fenugreek seeds
Fenugreek seedsDainik Gomantak
Published on
Updated on

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे जो खूप वेगाने वाढत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, गेल्या काही वर्षांत भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत आणि येत्या काही वर्षांत ही संख्या आणखी वाढू शकते. याचे कारण म्हणजे अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी, व्यस्त दिनचर्या, शारीरिक हालचालींचा अभाव आणि जीवनशैलीच्या वाईट सवयी.

(Fenugreek seeds are useful in reducing high blood sugar)

Fenugreek seeds
Facial Hair In Teenage: मुलींच्या चेहऱ्यावर केस येणे सामान्य गोष्ट नाही, जाणून घ्या त्यामागील कारण...

पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत. होय, मेथीचे दाणे भारतात अनेक प्रकारे वापरले गेले आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, मेथीचे दाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. चला, मधुमेहाच्या समस्येवर मेथीच्या दाण्यांचे फायदे आणि वापरण्याच्या पद्धतीबद्दल…

मधुमेहाच्या समस्येमध्ये मेथीच्या दाण्यांचे उत्कृष्ट फायदे:

मेथी दाणे पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त आहेत -

stylecraze.com नुसार, मेथीचे दाणे विरघळणाऱ्या फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत, ज्याच्या वापरामुळे पचनक्रिया मंदावते आणि साखरेचे शोषण वाढते. त्यामुळे उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मेथीचे दाणे ग्लुकोज सहिष्णुता वाढवतात –

मेथीच्या बियांचा वापर ग्लुकोज सहनशीलता वाढवण्यास तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे. मेथीच्या दाण्यांचा नियमित वापर केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी -

मेथीच्या दाण्यांचा वापर करून, एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याबरोबरच खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते.

Fenugreek seeds
Anger Management Tips : पटकन राग येऊन तुमचाही पारा चढतो? मग या गोष्टींनी स्वत:वर मिळवा नियंत्रण

मधुमेहाच्या रुग्णांनी मेथीचे दाणे असे वापरावे.

मेथी दाणे आणि दही -

साधारण एक चमचा मेथीचे दाणे बारीक वाटून पावडर तयार करा आणि ही पावडर साध्या दह्यात मिसळून सेवन करा. हे दिवसातून दोनदा सेवन केले जाऊ शकते.

भिजवलेले मेथी दाणे -

भिजवलेल्या मेथीचे दाणे डायबिटीजमध्ये खाऊ शकतात, यासाठी तुम्हाला दोन ते तीन चमचे मेथीचे दाणे दोन कप पाण्यात रात्रभर टाकून सकाळी रिकाम्या पोटी खावे लागतील.

मेथीचा चहा –

मधुमेही रुग्ण चहाऐवजी मेथीचा चहा वापरू शकतात, यासाठी मेथीची काही पाने एक कप पाण्यात टाकून ती चांगली शिजवून गाळून खावीत. मेथीची पाने चवीला कडू असल्याने त्यात मधही टाकता येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com