Skin Care Tips: त्वचेवर दिसणार्‍या 'या' लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका, अन्यथा...

तुम्ही त्वचेवर दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
Skin Care Tips
Skin Care TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Skin Care Tips: त्वचेची खास काळजी घेणे गरजेचे आहे. कारण असे अनेक आझार आहेत जे त्वचेमुळे शरीरात प्रवेश करतात. तसेच त्वचेवर उद्भवणाऱ्या काही लक्षणांमुळे अनेक रोग ओळखले जाऊ शकतात. 

त्वचेवर दिसणारी लक्षणे तुमच्या शरीरात होत असलेल्या बदलांचा पुरावा देऊ शकतात. अशी अनेक प्रकरणे पाहण्यात आली आहेत, जिथे रुग्ण त्वचेशी संबंधित काही समस्या घेऊन पुढे आला आणि काही गंभीर आजार आढळून आले. त्वचेवर सतत पुरळ येणे आणि खाज येणे ही देखील काही गंभीर समस्यांची लक्षणे असू शकतात.

एक रूग्ण त्वचेवर (Skin) पुरळ आणि खाज सुटण्याच्या तक्रारी घेऊन हॉस्पिटलमध्ये आला, जिथे चाचण्यांवरून असे दिसून आले की त्याला सेलिआक डिसीज आहे, एक ऑटोइम्यून डिसऑर्डर ज्यामुळे आतड्याला नुकसान होते. 

लवकर निदान झाल्यामुळे, रुग्णाने ताबडतोब उपचार सुरू केले. ज्यामुळे त्याचे जीवनमान खूप सुधारले. असाच काहीसा प्रकार आणखी एका रुग्णासोबत घडला. 

त्यांना अनेक महिन्यांपासून पिंपल्सचा (Pimples) त्रास होता, लाखो प्रयत्न करूनही तो बरा होत नव्हता. वेगवेगळ्या उपचारांचा प्रयत्न केला, पण परिस्थिती सतत खालावत गेली.

Skin Care Tips
Good Friday बद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
  • PCOS ची लक्षणे त्वचेवर दिसतात

तपासणी केली असता तिच्या पिंपल्सचे कारण 'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' असल्याचे आढळून आले. आजाराचे निदान झाल्यानंतर लगेचच उपचार सुरू करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. 

काही त्वचेच्या समस्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्याबद्दल देखील सांगू शकतात. जसे की मेलेनोमा. मेलानोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. कर्करोगाचा शरीराच्या इतर भागात प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी मेलेनोमा लवकर ओळखणे आणि उपचार करणे आवश्यक आहे.

  • अनेक रोग देखील ओळखता येतात

कर्करोगाव्यतिरिक्त त्वचेवर दिसणारी लक्षणे ही मधुमेह, यकृताचे आजार आणि किडनीच्या आजाराचीही लक्षणे असू शकतात. कोरडी त्वचा, खाज सुटणे, बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचे प्रमाण वाढणे आणि जखमा हळूहळू भरणे यासारखी लक्षणे मधुमेही रुग्णांमध्ये दिसून येतात. 

कावीळ आणि खाज यासारखी लक्षणे यकृताच्या आजारात दिसून येतात. जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर काही असामान्य बदल दिसत असतील तर, दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरकडे जा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com