पुरुषांची मक्तेदारी बनली या मुलींची आवड

घुमट हे पुरुषांनीच वाजवायचं वाद्य आहे या गैरसमजाला या महिलांनी अतिशय तडफदारपणे दूर केलेलं आहे.
Ghumat
Ghumat Dainik Gomantak
Published on
Updated on

घुमट (Ghumat) हे पुरुषांनीच वाजवायचं वाद्य (instrument) आहे या गैरसमजाला या ललनांनी अतिशय तडफदारपणे दूर केलेलं आहे. घुमट वाजवताना त्यांचा आवेश आणि लयबध्दतेला पाहता घुमटवादनात पारंगत असलेल्या कुठल्याही पुरुषापेक्षा त्या कमी नाही हे तत्काळ लक्षात येते. या आहेत तोर्डा, पर्वरी येथल्या ‘गणपती कला आणि संस्कृती संघा’च्या सदस्या.

Ghumat
Gauri Puja 2021: हटके दिसण्यासाठी ट्राय करा या टिप्स

या संघात १७ मुली आहेत. त्यांनी गेले वर्षभर कमालीचे श्रम घेऊन घुमटवादनाचे तंत्र आत्मसात केले आहे. गेल्या वर्षी ‘वुमन्स डे’च्या मुहूर्तावर (मुहूर्त सुध्दा त्यांनी तसाच प्रभावी निवडला) त्या एकत्र आल्या आणि त्यांनी घुमटवादनात आपला हात आजमावायचे ठरविले. प्रॅक्टीस सुरु झाली आणि कोविडच्या अरिष्टात लागलीच त्यात खंड पडला पण वातावरण थोडेसे निवळताच त्यांनी पुन्हा आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात केली.

त्यांची सुरुवात शून्यातून झाली. घुमटवादनाचीच काय पण आरती गायनाचे तंत्रही त्यांना ठाऊक नव्हते पण त्यांची जिद्द अटल होती. पर्वरीचेच सागर नाईक हे त्यांचे या प्रशिक्षणादरम्यानचे ‘मेंटर’ होते. सागर नाईक यांनी त्या साऱ्यांना या वाद्यांवर (घुमट, समेळ, कासाळे) श्रम घ्यायला प्रवृत्त केले आणि त्यांना प्रशिक्षित केले. कोविडपूर्व काळ आणि नंतर मिळून सुमारे ३ महिने या साऱ्यांनी अथकपणे घुमटवादनाची प्रॅक्टिस केली आहे. आणि ती देखील एखादा दुसरा तास नव्हे तर दर दिवशी कमीत कमी आठ तास याप्रमाणे.

Ghumat
गोव्याचं एक खास वैशिष्टय 'घुमट वाद्य’

सोशल मिडियावर व्हायरल झालेला त्यांचा घुमटवादनाचा व्हिडिओ पाहता त्यांनी अर्थातच तसे दीर्घ परिश्रम घेतले आहे याची प्रचिती निश्‍चितच येते. ज्या जोशात त्या घुमट आरती करतात तो जोश पाहणाऱ्यांवरही प्रभावी परिणाम करतो.

आत्तापर्यंत गोव्यात ठिकठिकाणी त्यांनी घुमटवादनाचे कार्यक्रम केले आहेत. पर्वरीतील प्रत्येक देवळात त्यांनी आपली सेवा दिली आहे. नेरुल येथील गणपतीच्या देवळात, बस्तोडा आणि बोरी येथील साईबाबांच्या देवळात आणि शिवोली येथील स्वामी मठात त्यांनी घुमट आरती सादर केलेली आहे.

त्यांचे घुमट वादन अथवा त्यांच्या एखाद्या घुमटवादनाचा व्हिडिआे आपल्याला पहायला मिळाला तर तो पहाच आणि त्यांच्या त्या जोशाने भारून जा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com