घरोघरी गणपती बाप्पा स्थापन झाले आहे. तसेच गौरीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गौरीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तीन दिवस साजरा होणारा हा सण मुळ नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जातात. विवध परंपरा आणि पद्धतीनुसार गौरीचे विवध प्रकारात पूजा केली जाते. गौरीचे दोन मुखवते असतात. एकीला ज्येष्ठ तर दुसरीला कनिष्ठ बोलल्या जाते. कोकणातील गौरी पूजन आणि गोव्यामधील गौरी पूजनाची थोडी भिन्नता आहे. कोकणामध्ये गौरी निमित्ताने गौरी मुर्तीचे पूजन केले जाते. पण सत्तरीत आणि डिचोली, पेडणे आणि दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये ही गौरी पूजन थोडे वेगळे आहे. जर तुम्हाला गौरी सणाला हटके दिसायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
* गौरी सणाला साडी घालणार असणार तर त्यात काही ट्विस्ट करू शकता. तुम्ही फुलांचा वापर करू शकता. यामुळे तुम्ही इतरांपेक्षा अधिक सुंदर दिसला. तुमचे आवडते फूल तुम्ही लावू शकता.
* बांगड्या घालत असला तर साडीवर मॅचिंग बांगड्या घालू शकता. सध्या ब्रासलेट खूप ट्रेंडमध्ये आहे. तसेच मार्केटमध्ये सुंदर आणि आकर्षक बांगड्या उपलब्ध आहेत. तुम्ही ब्रासलेट किंवा साडीवर मॅचिंग बांगड्या घातल्यास तुमचे लुक अधिक उठून दिसेल.
* कमरबंद पट्टा हा साडीवर आणि लेहंगा या दोन्हीवर खूप सुंदर दिसतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
* साडीसह विविध नेकलाइन ब्लाऊज घालू शकता. नेहमी फिटिंगचे ब्लाऊज घालावे. तसेच तुम्ही बॅकलेस ब्लाऊजसुद्धा घालू शकता.
* मेकअपबद्दल बोलायचे झाले तर फक्त आय लायनर किंवा काजळ लावण्यापेक्षा तुम्ही ड्रेस किंवा साडीला मॅचिंग लायनर लावू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांच्या मेकअप अधिक चांगला दिसतो.
* आजकाल लाइट शेड्सची लिपस्टिक लावण्याची फॅशन आहे. तुम्ही जर साडी किंवा ड्रेसला मॅचिंग किंवा त्याच्या विरुद्ध रंगाची लिपस्टिक लावल्यास तुमचा चेहरा अधिक खुलून दिसतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.