मस्करा खरेदी करताय ? थांबा आधी 'हे' वाचा

डोळे (Eyes) चोळल्याने डोळ्याखाली सुरकुत्या आणि पापण्या कोरड्या (Dry ) पडू शकतात.
Mascara
MascaraDainik Gomantak
Published on
Updated on

Makeup Tips : स्त्रिया आपल्या डोळ्यांची खास काळजी घेतात. याचे कारण म्हणजे कोणाचीही नजर सर्व प्रथम डोळ्याकडे जाते. अलीकडेच डोळ्यांच्या मेकअपचा ट्रेंड (Makeup Trends) खूप लोकप्रिय झाला होता. समान्यता: स्त्रिया डोळ्यांत आईलाइनर (Eyeliner), काजळ (Kajal) आणि मस्करा (Mascara) लावतात. यामुळे डोळे ठळक आणि सुंदर दिसतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का ,की मस्करा (Mascara) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी लागते. अन्यथा डोळ्याना नुकसान होऊ शकते. मस्करा (Mascara) खरेदी करतांना कोणती काळजी (Care) घ्यावी जाणून घेऊया.

अनेक लोकांना याची माहिती नसते की डोळ्याना देखील मॉइश्चरायझिंग (Moisturizing) करण्याची गरज असते. पापण्यांना नारळ तेल, एरंड्यांचे तेल, जोजोबा तेल, आणि वैसलीन लाऊन डोळ्यांना मॉइश्चरायझिंग करता येते. यामुळे पापण्यांना मस्कऱ्यांमुळे हानीपासून बचाव होऊ शकतो. डोळ्यांच्या पापण्यांना कोणत्याही प्रकारचे केमिकल किंवा बॉडी लोशन वापरणे टाळावे.

Mascara
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

मस्करा प्राइमर

मस्करा प्राइमर लैशेजसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर रोज मस्करा लावायला आवडत असेल तर तुम्ही हा मस्करा खरेदी करू शकता. यामुळे डोळ्याच्या पापण्या मजबूत आणि सुरक्षित राहतात.

चांगले आणि योग्य उत्पादन वापरावे

मस्कऱ्यापासून होणारा नुकसान टाळण्यासाठी ब्रॅंडेड मस्करा वापरावा. जर एखाद्या उत्पादनात फॉर्मलाडेहाइड, सिंथेटिक आणि टार डाई यासारखे हानिकारक बाबी असतील तर असे उत्पादन वापरणे बंद करावे.

Mascara
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

एक्सपायरी डेट पाहून खरेदी करावे

मस्कराची शेल्फ लाईफ कमी असते. म्हणून त्यांच्या एक्सपायरी डेट तपासून घेणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी दर सहा महिन्यांनी मस्करा बदलावा.

डोळ्याना जास्त चोळणे टाळा

अनेकांना सारखे डोळे चोळण्याची सवय असते. तसेच बरेचजन थकवा दूर करण्यासाठी डोळ्यांना चोळतात . परंतु असे न करण्याचा सल्ला दिल जातो. कारण डोळे चोळल्याने डोळ्याखाली सुरकुत्या आणि पापण्या कोरड्या पडू शकतात.

Mascara
Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी करा 'हे' चार उपाय

जोपतान मेकअप काढावा

रात्री झोपताना सर्वात आधी मेकअप काढावा. मेकअप न काढता झोपल्यास त्वचेला खूप नुकसान होऊ शकते. आपण मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर वापरू शकतो. हे त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी कॉटन बॉलवर मेकअप रिमूव्हर चे काही थेंब टाकून मेकअप काढून टाकावा.

कोणता आहार घ्यावा -

डोळ्यांच्या पापण्याची बाहेरून काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहार देखील खुप् महत्वाचा आहे.आपल्या आहारात नियमितपणे व्हिटॅमिन 'डी ' आणि 'ई' असलेल्या पदार्थांचा समावेश करावा आणि ई असलेल्या गोष्टींचा समावेश करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com