वृद्धांची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टींची घ्या काळजी

वृद्ध लोकांनी व्यायाम केल्यास त्यांचे आरोग्य निरोगी राहते.
Take care of these 5 things to take care of the elderly
Take care of these 5 things to take care of the elderly Dainik Gomantak

अनेक घरात वृद्धां लोक हे असतात. त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक असते. वयोमानानुसार लोक शारीरिकदृष्ट्या कमकुवत होतात. यामुळे यांची काळजी घेणे आवश्यक असते. यांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

* शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा

शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्याने शरीरावर वयाचा प्रभाव कमी करतो. वृद्ध लोकांनी व्यायाम केल्यास त्यांचे आरोग्य निरोगी राहते. यामुळे शरीराचे संतुलन राखण्यास मदत मिळते. नियमितपने व्यायाम केल्यामुळे मधुमेह, अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी होते.

* पुरेशी झोप घेणे आवश्यक

वृद्धत्वाबरोबर वृद्धामध्ये झोप ण येण्याची समस्या अधिक जाणवते. या वयात झोप कमी झाल्याने हृदय आणि मेंदूशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ञांचा सल्ला घेवून झोपेचे औषध घ्यावे. तसेच शक्य असल्यास व्यायाम आणि ध्यान करावे.

Take care of these 5 things to take care of the elderly
ओल्या केसांमध्ये हेयरस्प्रे करणे टाळा

* सोशल लाईफ संपुष्टात येवू नये

चांगल्या सामाजिक जीवनाचा वृद्धांच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. एका अभ्यासानुसार सामाजिक व्यस्तता वृद्धांमध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते. अनेक उद्यानात अनेक वृद्धाचा समूह दिसतो. पण एकाकीपणामुळे वृद्धाच्या आरोग्यावरअनेक परिणाम होतात. यामुळेच एकाकी राहणे टाळावे.

* सकस आहार आवश्यक

वृद्ध लोकांमधील आजार कमी होण्यासाठी संतुलित आहार देणे गरजेचे आहे. या लोकांचा आहारात चरबीयुक्त गोष्टी कमी असाव्यात आणि फायबरयुक्त गोष्टींचे प्रमाण जास्त असावे. यामुळे त्यांची पचनसंस्था चांगली राहते. या लोकांना आहारात फळे, हिरव्या भाज्याना प्राधान्य द्यावे.

इतर काळजी

वृद्ध लोक जर घरात असतील तर ऑक्सिमीटर, बीपी मशीन, शुगर टेस्टिंग मशीन, नेब्युलायझर, थर्मामीटर इत्यादि गोष्टी घरात असणे आवश्यक आहे. जर मधुमेह आजार असेल तर नियमितपाने तपासणी करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com