निरोगी त्वचेसाठी (Skin) निरोगी आहार, व्यायाम आणि जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टी तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतील. तुम्ही अनेक प्रकारच्या सुपर बियांचा (Seeds)आहारात समावेश करू शकता . यामध्ये भोपळ्याच्या बिया, चिया बिया, फ्लेक्स बिया, भांग बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेश होतो. या बियांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात (Food) करू शकताच, पण त्यांचा वापर फेस मास्क (Face Mask) म्हणूनही करू शकता.
* सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफूलाच्या बिया (Sunflower Seeds) देखील सुपरफूड बिया आहेत. या बिया त्वचेसाठी आणि आरोग्यसाठी फायदेर आहेत. यात झिंक, पोषक तत्वे, मॅग्नेशियम आणि लोह असते. या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेची चमक वाढवते.
* अंबाडी बिया
या बिया (Seeds) हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी ओळखल्या जातात. आपण फेस मास्क म्हणून फ्लेक्ससीड्स देखील वापरू शकता. ते तुमच्या तवचेल मरुमांपासून मुक्त होण्यास आणि जळजळ दूर करण्यास मदत करतात.
* सब्जा बिया
सब्जा बिया त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर आहे. या बियांमध्ये अनेक पोषक घाट असतात. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडही असते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत मिळते.
* भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया आरोग्यदायी असतात. या मुबलक प्रमाणात झिंक असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. या बिया त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.