Summer Tips For Gardening: उन्हाळ्यात तुमच्या बागेतील झाडे सुकत असतील तर करा 'या' 5 गोष्टी

उन्हाळ्यात बागेतील झाडांची काळजी घेणे गरजेचे असते.
Summer Tips
Summer TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Gardening Tips in Summer: उन्हाच्या झळा सुरु झाल्या आहेत. बाहेरील वाढत्या तापमानामुळे कुंड्यांमध्ये ठेवलेली झाडे व सुकू लागतात. यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. भांड्यात ठेवलेली झाडे काळजी अभावी सुकतात उष्णतेमुळे त्यांची पाने जळून जातात.

बागकामाची आवड असलेल्या लोकांना उष्णतेपासून आपल्या झाडांचे संरक्षण कसे करायचे याची चिंता आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी उन्हाळी बागकामाच्या अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमची झाडे मरण्यापासून वाचवू शकता आणि त्यांना नवीन जीवन देऊ शकता.

  • योग्यवेळी पाणी द्यावे

जरी उन्हाळ्यात झाडांना जास्त पाणी लागते, परंतु लक्षात ठेवा की त्यांना दुपारी पाणी देऊ नका. रोपांना फक्त सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा पाणी दिले तर चांगले होईल. असे केल्याने रोपांच्या मुळांमध्ये गरम वाफ तयार होणार नाही आणि झाडे कोमेजणार नाहीत.

  • आर्द्रता तपासावी

या दिवसात उष्णतेच्या लाटेमुळे कुंडीतील बाहेरची माती सुकते, त्यामुळे उष्णतेमुळे झाडांची मऊ पाने जळू लागतात. अशा परिस्थितीत वेळोवेळी झाडांची आर्द्रता तपासत रहा. आपण त्यांना ओल्या कापडाने झाकून ठेवू शकता.

  • खतपाणी द्यावे

रोपांना पुरेसे पोषण द्या, जेणेकरून ते हिरवे राहतील आणि त्यांची वाढ चांगली होईल. त्यासाठी वेळोवेळी खते इ. देत रहा. आपण सेंद्रिय खत देखील वापरू शकता.

सावलीत लागवड करावी

तुम्ही सावलीमध्ये सर्व झाडे ठेउ शकता. जर तुम्ही त्यांना उष्ण आणि ऊन लागेल अशी ठिकाणी ठेवले तर ते सुकून जातील आणि जळतील. झाडांना जास्तीत जास्त एक ते दोन तास उन्हात ठेवणे चांगले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com