Skin Care Tips: उन्हाळ्यात त्वचा कोरडी होतीयं? 'या' फेस पॅकचा करा वापर

जर तुमची त्वचा देखील उन्हाळ्यात ड्राय पडत असेल तर या घरगुती उपायांचा करावा वापर.
Summer beauty Skin Care Tips, Face Packs For Dry Skin, Home Remedies for dry skin
Summer beauty Skin Care Tips, Face Packs For Dry Skin, Home Remedies for dry skinDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्यात (Summer) अनेकांची त्वचा (Skin) कोरडी पडते. यामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते. यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी (Care) घेणे आवश्यक आहे. तुमचीही त्वचा कोरडी (Dry Skin) पडत असेल तर तुम्ही हे फेस पॅक वापरू शकता. (Summer beauty Skin Care Tips)

* कोरड्या त्वचेसाठी फेस पॅक

1) मध आणि केळीचे फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी 1 केळ, 1 चमचा मध आणि 1 कप दही हे साहित्य घ्यावे. एका बाउलमध्ये केळी बारीक करून घ्यावे. नंतर यात दही (Curd) आणि मध चांगले मिक्स करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर (Face) 20 मिनिटे ठेवावा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

2 ) ऑलिव्ह ऑईल आणि मध

हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे मध, दोन चमचे ऑलिव्ह ऑईल. 2 ते 3 थेंब लॅव्हेंडर तेल हे साहित्य घ्यावे. हे सर्व साहित्य एक बाउलमध्ये टाकून मिक्स करावे. ऑलिव्ह ऑईलमुले त्वचेला पोषण मिळते, मध त्वचेला मॉइश्चरायझ करते. हे फेस पॅक त्वचेवर 15 ते 20 मिनिटे ठेवावा.नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावे. यामुळे त्वचेवरील चमक वाढून कोरडेपणा कमी होते.

Summer beauty Skin Care Tips, Face Packs For Dry Skin, Home Remedies for dry skin
Hair Care: उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट होतायत? घ्या केसांची अशी काळजी

3) अंडी आणि आंबट मलई

हा फेस पॅक बनवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग, 2 चमच मलाई घ्यावे. सर्वात पहिले अंड्याचा पांढरा भाग आणि मलाई चांगले मिक्स करून घ्यावे. फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवावे. हे पॅक वळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. उन्हाळ्यात तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर या फेसपॅकचा वापर करावा.

4) गुलाबपाणी आणि मध

हा फेस पॅक (Face Pack) बनवण्यासाठी तुम्हाला 3 चमच गुलाबजल, 1 चमचा मध आवश्यकतेनुसार घ्यावे. हे दोन्ही साहित्य चांगले मिक्स करावे. हे पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे राहू द्यावे आणि नंतर थंड पाण्याने धुवावे.यामुळे त्वचेचा कोरडेपना कमी होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com