Almond Banana Smoothie Recipe: बदाम-केळी स्मूदी उन्हाळ्यात तुम्हाला ठेवेल एनर्जेटिक!

बदाम आणि केळीची स्मूदी हेल्दी असुन बनवायला सोपी आहे.
Almond Banana Smoothie Recipe
Almond Banana Smoothie RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात निरोगी आणि थंड करायची असेल, तर बदाम केळी स्मूदी हा उत्तम पर्याय असू शकतो. केळी आणि बदाम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केळी आणि बदामापासून बनवलेली स्मूदी केवळ चवदारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.

बदाम-केळीची स्मूदी खास करून उन्हाळ्यात (Summer) प्यायली जाते. त्यामुळे मनाला ताजेपणाही येतो. बदाम आणि केळ्याची स्मूदी जितकी हेल्दी बनवायला सोपी आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची (Health) काळजी घेत असाल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या स्मूदीने करू शकता. बदाम-केळी स्मूदी बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

  • बदाम केळी स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सोललेली बदाम - 4/5

केळी चिरलेली - 1 कप

दूध थंड - 1/5 कप

व्हॅनिला एसेन्स - 1/2 टीस्पून

बिया काढून टाकलेले खजूर - 2

बर्फाचे तुकडे - 3/4

Almond Banana Smoothie Recipe
Surya Namaskar Easy Tips: सूर्यनमस्कार करण्यापूर्वी 'असा' सराव करणे गरजेचे
  • बदाम आणि केळी स्मूदी बनवण्याची कृती

बदाम आणि केळी स्मूदी बनवण्यासाठी आधी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी बदाम सोलून घ्या. यानंतर केळीची साल काढून त्याचे तुकडे करा. आता दोन खजूर घ्या, त्यांच्या बिया काढा आणि त्यांचे तुकडे करा. हे सर्व साहित्य एकत्र मिक्सर जारमध्ये ठेवा. यानंतर, जारमध्ये थंड दूध आणि व्हॅनिला इसेन्स घाला आणि सर्व साहित्य गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा.

लक्षात ठेवा की स्मूदी मऊ आणि फेसाळ होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र करावे लागेल. यानंतर एका भांड्यात बदाम-केळी स्मूदी काढा. नंतर भांड्यात 3/4 बर्फाचे तुकडे टाका आणि स्मूदी थोडावेळ राहू द्या जेणेकरून ते व्यवस्थित थंड होईल. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये थंडगार स्मूदी घाला आणि सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com