Homemade Face Pack: ‘हे’ घरगुती फेस पॅक उन्हाळ्यात त्वचेला ठेवणार ग्लोइंग

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खुप गरजेचे असते.
Homemade Face Pack:
Homemade Face Pack:Dainik Gomantak

Summer Care Tips: उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आरोग्यासह त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेला थंड ठेवण्यासाठी अनेक नैसर्गिक पद्धतींचा वापर करता येतो.

उन्हाळ्यात गुलाब जलचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला थंड ठेवण्याचे काम करते. यासाठी एका भांड्यात थोडे गुलाब पाणी घ्यावे. त्यात कापूस टाकावा. ते त्वचेवर लावावे.

यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते. तसेच रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे त्वचा चमकदार होते. गुलाबजल व्यतिरिक्त तुम्ही त्वचेसाठी इतरही अनेक गोष्टी वापरू शकता. चला जाणून घेऊया त्वचेसाठी उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचा वापर करावा.

  • काकडी

एका भांड्यात काकडीचा किस घ्यावा. त्यात थोडे टरबूज घालावे. नंतर त्यात दूध पावडर आणि पांढरे अंड्याचा पांढरा भाग घाला. या गोष्टी मिक्स करून चेहरा आणि मानेला लावावे. अर्धा तासानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावे.

skin care tips
skin care tipsDainik Gomantak
Homemade Face Pack:
Vastu Tips: शूज अन् चप्पल घरात अस्ताव्यस्त ठेवल्यास होऊ शकते धनहानी
  • ग्रीन टी

एका भांड्यात ग्रीन टी पावडर घ्यावी. त्यात दही आणि कोरफड जेल घालावा. या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहरा आणि मानेला लावावा. थोडा वेळ राहू द्या. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

green tea
green teaDainik Gomantak
  • मुलतानी माती

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती खूप फायदेशीर आहे. यासाठी एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्यावे. त्यात गुलाबजल टाकावे. काही काळ त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवावा.

multani mati
multani matiDainik Gomantak
  • काकडीचा रस आणि गुलाबपाणी

एका भांड्यात 1 चमचा काकडीचा रस घ्यावा. त्यात समान प्रमाणात गुलाबजल टाकावा. या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला लावा. 20 मिनिटे ठेवा. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

cucumber
cucumberDainik Gomantak

नारळ पाणी

त्वचेसाठी तुम्ही नारळाचे पाणी किंवा नारळाचे दूध वापरू शकता. यासाठी एका भांड्यात नारळ पाणी घ्यावे. 20 ते 30 मिनिटे त्वचेवर ठेवा. यानंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवावा.

coconut
coconutDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com