Vastu Tips: शूज अन् चप्पल घरात अस्ताव्यस्त ठेवल्यास होऊ शकते धनहानी

तुम्हीही घरात शूज आणि चप्पल अस्ताव्यस्त ठेवता का?
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहे. हे नियम अतिशय उपयुक्त मानले जातात. वास्तूमधील प्रत्येक वस्तूला विशिष्ट दिशा दिली जाते. वास्तुशास्त्रात घरात शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरावर आर्थिक समस्या येउ शकतात. मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

घरात शूज आणि चप्पल कधीही उलट सुलट ठेवू नयेत. जर घरातील सदस्याने चुकून त्यांना उलटे सोडले असेल तर त्यांना ताबडतोब सरळ करा. शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. कौटुंबिक सुख विस्कळीत होते.

Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

वास्तु नियमांनुसार शूज आणि चप्पल उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिशेला चप्पला आणि शूज ठेवल्यास माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून जाते.

Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

अनेक वेळा आपण घाईघाईने घरात कुठेही शूज आणि चप्पल काढतो. असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते. घरातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तूनुसार शूज आणि चप्पल कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत.

Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

वास्तु नियमांनुसार बाहेरून आल्यावरही शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेला काढायला हवी. त्याचबरोबर घराच्या मुख्य दारावर बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com