Sudden Heart Attack: जर तुमच्यासमोर कुणाला हार्ट अटॅक आला तर 'हे' काम नक्की करा

अनेक वेळा आपल्या आजूबाजूला कोणाला हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे हे जाणून घेऊया.
Heart Attack|Sudden Heart Attack
Heart Attack|Sudden Heart AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Sudden Heart Attack: भारतात हृदय विकारांची संख्या वाढत आहे. पण हा आजार सध्या तरुणांमध्ये जास्त वाढत आहे.परंतु अनेक वेळा फिट दिसणारे लोकही या आजाराला बळी पडतात.

बॉलिवुडमधील अनेक सेलेब्रिटींना हृदयविकारांच्या झटक्याने जीव गमवावा लागला आहे. जर तुमच्या आजुबाजुला एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर अशावेळी काय करावे जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल. चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे...

जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये रक्त पुरवठ्यात अचानक अडथळा येतो तेव्हा या स्थितीला हृदयविकाराचा झटका म्हणतात. हा अडथळा खरं तर कोरोनरी आर्टरीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे होतो. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा थांबतो आणि छातीत तीव्र वेदना होतात.

  • हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय करावे?

गायक केकेचे 2022 मध्ये जेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम झाले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अनेक ब्लॉकेजेस आहेत आणि त्यांना वेळीच सीपीआर दिला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते.

हृदयविकाराचा झटका आल्यास, रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे, जर जवळपास वैद्यकीय मदत उपलब्ध नसेल तर रुग्णाला सीपीआर द्यायाला सुरूवात करावी.  

Heart Attack|Sudden Heart Attack
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात घ्या हेल्दी पनीर उत्तपमचा आस्वाद, नोट करा रेसिपी
CPR
CPRDainik Gomantak
  • CPR म्हणजे काय?

सीपीआरला खरंतर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणतात. ज्यामध्ये बेशुद्ध रुग्णाच्या छातीवर दबाव टाकला जातो आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. ज्यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. 

त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि श्वासोच्छवासाच्या त्रासात व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. सीपीआर ही आपत्कालीन परिस्थितीत दिली जाणारी वैद्यकीय चिकित्सा मानली जाते. ही एक प्रयत्न केलेली आणि चाचणी केलेली पद्धत आहे. ज्याने श्वासोच्छवासाच्या समस्यांमुळे ग्रस्त असलेल्या लोकांचे प्राण वाचवले आहेत.
 

  • अँजिओप्लास्टीमुळे जीव वाचेल

सहसा हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया केली जाते. ही कार्डिओलॉजीची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील अडथळे दूर करून त्या उघडल्या जातात. अनेक प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या कोरोनरी धमन्यांमध्ये स्टेंट देखील टाकले जातात, जेणेकरून रक्तप्रवाहात कोणतीही अडचण येऊ नये.

  • हार्ट अ‍ॅटॅक येण्यापुर्वी मिळतात हे संकेत

हृदयाच्या धमण्या ब्लॉक झाल्यावर आपल्याला छातीमध्ये जड वाटू शकते. तुम्ही थोडे मेहनतीचे काम केले तर तुम्हाला दम लागणे, छातीत दुखणे , गुदमरणे, अस्वस्थता आणि बैचेनी वाटू शकते.

थकवा जाणवणे, श्वासाची गती वाढणे, हृदयाची धडधड वाढणे अशा प्रकारचे संकेत तुमच्या धमण्या तुम्हाला देत असतात. याशिवाय हृदयाचे इतर आजार, मधुमेह आणि हाय बल्ड प्रेशर यामुळे छातीतल्या दुखण्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढू शकते.

  • हृदयाला असे ठेवा निरोगी

1. तंबाखूचे सेवन बंद करा.

2. दारुपासून दूर राहा.

3. मधूमेह , हाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांनी नियमित चेकअप केले पाहिजे.

4. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

5. दररोज कमीतकमी 7-8 तास चांगली झोप घ्या.

5. सकस आहार घ्या.

8. जंकफूड, जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा.

9. वजन( Weight ) नियंत्रणात ठेवा.

10. नियमित व्यायाम करा. आठवड्यातले 5 दिवस 35-45 मिनिट तुम्ही चालण्याचा व्यायाम करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com