Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात घ्या हेल्दी पनीर उत्तपमचा आस्वाद, नोट करा रेसिपी

हा पदार्थ बनवायला सोपा असून हेल्दी देखील आहे.
Morning Breakfast Recipe
Morning Breakfast RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

Paneer Uttapam Recipe: सकाळीची सुरूवात हेल्दी असावी असे प्रत्येकाला वाटते. पण सकाळी घाइ असल्याने नाश्त्या रोज काय बनवावे हा प्रश्न सर्व महिलांना पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर नाश्त्यात पनीर उत्तपम बनहव शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून हेल्दी देखील आहे. यात भाज्या असूनही ते मुलही आवडीने खातात. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे पनीर उत्तपम.

  • पनीर उत्तपम बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 वाटी रवा

1/2 वाटी दही

1/2 वाटी पाणी

1 वाटी किसलेले पनीर

1/2 बारीक चिरलेला कांदा

1/2 गाजर, बीन्स, ब्रोकोली

गरजेनुसार कोथिंबीर

एक टीस्पून ओरेगॅनो

एक टीस्पून चिली फ्लेक्स

इनो

चवीनुसार मीठ

Morning Breakfast Recipe
Street Food In Monsoon: पावसाळ्यात स्ट्रीट फूड म्हणजे आजारांचे माहेरघर
  • पनीर उत्तपम बनवण्याची कृती

उत्तपम बनवण्यासाठी सर्वात पहिले एका बाऊलमध्ये दह्याबरोबर रवा मिक्स करावा. थोडेसे पाणी घाला आणि झाकून अर्धा तास बाजूला ठेवावे. अर्ध्या तासानंतर रवा फुगतो आणि पीठ घट्ट होईल. हे चांगले मिक्स करावे.

आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवावा. त्यात तेल घाला आणि गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घाला सोनेरी होईपर्यंत नीट भाजून घ्यावा. नंतर त्यात बारीक किसलेले गाजर, बीन्स, ब्रोकोली आणि हव्या त्या भाज्या घालाव्या.

नंतर त्यात ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ घालून मिक्स करावे. आता किसलेले पनीर घालून मिक्स करून भाजून घ्या आणि गॅस बंद करावा. आता हे तयार केलेले भाज्यांचे मिश्रण दही आणि रव्याच्या पिठात घालावे. 

गॅसवर पॅन ठेवू गरम करा आणि त्यावर बटर घालावे. आता पॅनमध्ये उत्तपमचे मिश्रण पसरवून झाकण ठेवून एक मिनिट शिजू द्या. शिजल्यावर उलटे करून परत शिजवा. तुमचे टेस्टी आणि हेल्दी उत्तपम तयार आहे. नारळाच्या चटणीसोबत आस्वाद गेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com