Stomach Ulcer: पोटात अल्सर झाल्यास शरीर देते ‘हे’ संकेत, वेळीच व्हा सावध; जाणून कारणे, लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Stomach Ulcer Symptoms: आजच्या धावपळीच्या जगात बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. यापैकीच एक म्हणजे पोटातील अल्सर. जर या समस्येवर जर वेळेवर उपचार न केल्यास गंभीर रुप धारण करु शकते.
Stomach Ulcer Symptoms
Stomach UlcerDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या धावपळीच्या जगात बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. यापैकीच एक म्हणजे पोटातील अल्सर. जर या समस्येवर जर वेळेवर उपचार न केल्यास ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. चला तर मग पोटातील अल्सरची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यांविषयी डॉक्टरांकडून जाणून घेऊया...

पोटाचा अल्सर म्हणजे काय?

मॅक्स हॉस्पिटलमधील डॉ. रोहित कपूर सांगतात, गॅस्ट्रिक अल्सर ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये पोटामध्ये जखमा किंवा फोड तयार होतात. हे फोड अन्न पचवण्यास मदत करणाऱ्या आम्ल आणि एन्झाईम्समुळे होतात. या फोडांमुळे चिडचिड, वेदना आणि पचन समस्या उद्भवू शकतात.

Stomach Ulcer Symptoms
Best Vegetables For Heart Health: हृदयरोग टाळायचाय? मग 'या' 5 भाज्या तुमच्या आहारात हव्याच

पोटात अल्सर होण्याची प्रमुख कारणे कोणती?

मॅक्स हॉस्पिटलमधील डॉ. रोहित कपूर यांच्या मते, हेलिकोबॅक्टर पायलोरी हा एक जीवाणू असून तो पोटातील म्यूकस थराला हानी पोहोचवतो, ज्यामुळे आम्ल पोटातील संरक्षक भिंतींपर्यंत पोहोचते, ज्यामुळे अल्सर होतो.

वेदनाशामक औषधांचा जास्त वापर: एस्पिरिन, आयबुप्रोफेन इत्यादी वेदनाशामक औषधांचा जास्त काळ वापर केल्याने पोटाचा संरक्षणात्मक थर कमकुवत होतो, ज्यामुळे अल्सर होतो.

जास्त मसालेदार अन्न: गरम मिरच्या, मसाले आणि जंक फूड (Junk food) खाल्ल्याने अल्सरचा धोका वाढतो.

ताण आणि चिंता: सततचा ताण शरीरात आम्लाचे उत्पादन वाढवतो, ज्यामुळे अल्सर होण्याची शक्यता वाढते.

मद्यपान आणि धूम्रपान: जास्त प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान केल्यानेही अल्सर होऊ शकतो.

Stomach Ulcer Symptoms
Heart Health Tips: सिगारेट की अल्कोहोल? हृदयासाठी जास्त धोकादायक काय? जाणून घ्या काय सांगतायेत तज्ञ

पोटाच्या अल्सरची लक्षणे

पोटात जळजळ किंवा वेदना: ही वेदना सहसा अन्न खाल्ल्यानंतर किंवा रिकाम्या पोटी जास्त जाणवते. वेदना जळजळीसारखी असते.

आंबट ढेकर येणे आणि आम्लता: वारंवार आंबट ढेकर येणे, घसा आणि छातीत जळजळ होणे हे अल्सरचे लक्षण असू शकते.

उलट्या किंवा मळमळ: जर तुम्हाला उलट्या होत असतील किंवा वारंवार मळमळ होत असेल तर ते अल्सरचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे आणि वजन कमी होणे: भूक न लागणे किंवा खाण्याची भीती, तसेच जलद वजन कमी होणे हे अल्सरचे लक्षण असू शकते.

काळे मल किंवा रक्त: जर मल काळे असेल किंवा त्यात रक्त दिसत असेल तर ते एक धोकादायक लक्षण आहे. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

काळजी काय घ्यायची?

मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. रोहित कपूर सांगतात, काही गोष्टी लक्षात ठेवून पोटातील अल्सरचा धोका टाळता येतो. जसे की आहार (Diet) सुधारणे, हलके, सहज पचणारे आणि कमी मसालेदार अन्नाचे सेवन करणे. ताण कमी घेणे, योग, ध्यान किंवा कोणताही आवडता व्यायाम करणे. तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळणे. याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये. विशेषतः कधीही स्वतःहून वेदनाशामक औषधे घेऊ नये.

Stomach Ulcer Symptoms
Heart Health Tips: सिगारेट की अल्कोहोल? हृदयासाठी जास्त धोकादायक काय? जाणून घ्या काय सांगतायेत तज्ञ

डॉक्टरांना कधी भेटायचे?

जर वर नमूद केलेली लक्षणे दिसून आली किंवा पोटात तीव्र वेदना होत असतील रक्ताच्या उलट्या होत असतील किंवा मलमध्ये रक्त दिसत असेल, तर उशीर करु नका. हे गंभीर अल्सरचे लक्षण असू शकते. तसेच, वेळेवर उपचार न केल्यास तो प्राणघातक देखील ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com