Diwali Foods: 'या' सहा प्रकारचे चविष्ट लाडू करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करा

दिवाळी सुरू होण्यापूर्वी अनेक ठिकाणी फराळ आणि मिठाई बनवण्याची प्रक्रिया सुरू होते.
Diwali Ladoo
Diwali Ladoo Dainik Gomantak

Diwali Foods: भारतात सर्वत्र साजरा होणार दिवाळी हा मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. दिवाळीच्या काळात खूप धमाल-मस्ती आणि खाण्यापिण्याची चंगळ असते. दिवाळी सुरू होण्यापूर्वी अनेक ठिकाणी फराळ आणि मिठाई बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. दिवाळीत अनेक प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आकर्षण असते. यावेळी या सहा प्रकारचे तुम्ही पारंपरिक लाडू बनवून दिवाळीचा आनंद द्विगुणित करू शकता.

मोतीचूर लाडू
मोतीचूर लाडू

मोतीचूर लाडू - दिवाळीत मोतीचूर लाडू बनवण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीत आपण लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या देवतांना देखील मोतीचूर लाडू खूप आवडतात. मोतीचूर लाडू बनवण्यासाठी बेसन, देशी तूप, साखर आणि खाण्यात वापरला जाणारा गोड पिवळा रंग याची आवश्यकता असते.

बेसन लाडू
बेसन लाडू

बेसन लाडू - बेसन लाडूचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बेसन लाडू बनवायला अगदी सोपे असतात, बेसनाचे लाडू चवीला तितकेच अप्रतिम असून, बेसन, देशी तूप, सुका मेवा, वेलची पावडर यांचा वापर करून ते बनवले जातात.

Diwali Ladoo
Excessive Thirst : तुम्हालाही आहे का अति पाणी पिण्याची सवय? आरोग्यासाठी असू शकते गंभीर
गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे लाडू
गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे लाडू

गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे लाडू - बेसनाच्या लाडूशिवाय गव्हाच्या पिठापासून बनवलेले लाडूही अनेकांना आवडतात. पिठापासून बनवलेले लाडू दिवाळीच्या तुमच्या फराळाच्या विविधतेत भर घालतात. ते बनवण्यासाठी गव्हाच्या पिठासोबत गूळ, देशी तूप आणि काजू वापरतात.

नारळाचे लाडू
नारळाचे लाडू

नारळाचे लाडू - कोणत्याही खास प्रसंगी नारळाचे लाडू बनवले जातात. दक्षिणेत ते खास खास प्रसंगी बनवले जातात. नारळाचे लाडू बनवण्यासाठी नारळ, साखर, मावा, काजू, बदाम आणि वेलची पावडर वापरली जाते.

Diwali Ladoo
Indian Sitting Eating Style : फक्त भारतीय संस्कृतीच नाही जमिनीवर बसून जेवणे; तर आरोग्यासाठीही आहेत खूप फायदे
रव्याचे लाडू
रव्याचे लाडू

रव्याचे लाडू - दिवाळीच्या निमित्ताने रव्याचे लाडू बनवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. रवा, देशी तूप, काजू, बेदाणे इत्यादी घटक घालून रव्याचे लाडू बनवले जातात.

ड्राय फ्रुट्स लाडू
ड्राय फ्रुट्स लाडू

ड्राय फ्रुट्स लाडू - चव आणि पोषक तत्वांनी समृद्ध, ड्रायफ्रुट्स लाडू कोणत्याही उत्सवाची मजा वाढवत असतात. ड्राय फ्रुट्स लाडू तयार करण्यासाठी भरपूर प्रकारचा सुका मेवा वापरला जातो. यासोबत नारळ पावडर, वेलची पावडर आणि देसी तूपही वापरले जाते. तेंव्हा या दिवाळीत हे लाडू नक्की घरी करा तसेच, तुमच्या नातेवाईकांना भेट द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com