Soaked Peanuts Benefits: 'या' छोट्याश्या दाण्यामध्ये लपलय आरोग्याचा खजिना

शेंगदाणे खायला आवडत असेल तर तुम्ही आहारात भिजवलेल्या शेंगदाण्याचा समावेश करावा.
Soaked Peanuts Benefits
Soaked Peanuts BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Soaked Peanuts Benefits: निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे असते. भाज्या, फळांसह तुम्ही आहारात शेंगदाण्याचा समावेश करू शकता. पण भिजवलेले शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. त्यात अनेक पौष्टीक घटक असतात. योग्य वेळी आणि प्रमाणात खाल्ल्यास अनेक फायदे मिळू शकतात.

डोळ्यांचे आरोग्य

भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. याशिवाय ज्यांची दृष्टी कमकुवत आहे किंवा त्यांच्या डोळ्यांवर खूप ताण आहे त्यांनीही भिजवलेले शेंगदाणे खावे. हे शेंगदाणे स्मरणशक्ती मजबूत करते आणि दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करते.

खोकला कमी

सध्या व्हायरल इंफेक्शन होणारा खोकला तुम्हाला अनेक दिवस त्रास देतो. या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे खावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्ग लवकर बरा होण्यास मदत मिळते.

गॅस किंवा ऍसिडिटी

ज्या लोकांना अॅसिडिटी आणि गॅसची समस्या आहे त्यांनी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आराम मिळतो. या शेंगदाण्यांमध्ये मॅगनीज, तांबे, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि सेलेनियम देखील भरपूर प्रमाणात असतात. रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅसपासून आराम मिळतो. जर तुम्हालाही गॅसची समस्या असेल तर तुम्ही भिजवलेले शेंगदाणे खाऊ शकता.

Soaked Peanuts Benefits
Kitchen Hacks: किचनमधील स्टेनलेस स्टीलचे सिंक स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

पचनसंस्था सुरळित कार्य करते

शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. या शेंगदाण्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते. 

हृदयाचे आरोग्य

शेंगदाणे भिजवून ठेवल्याने त्यांची सालही पाणी चांगले शोषून घेते. ही साल रक्तप्रवाह योग्य ठेवण्यासाठी मदत करते. या सालीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे शरीरातील चयापचय गतीही चांगली राहते.

पाठदुखी कमी होते

ज्या लोकांना पाठदुखीची समस्या आहे त्यांनी गुळासोबत भिजवलेले शेंगदाणे खावे. यामुळे दिवसभर बसून राहिल्याने होणाऱ्या पाठदुखीपासून आराम मिळतो.जे लोक बैठे काम जास्त करतात त्यांनी नियमितपणे भिजवलेले शेंगदाणे खावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com