Kitchen Hacks: किचनमधील स्टेनलेस स्टीलचे सिंक स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

स्टेनलेस स्टील सिंकमधील चिकट डाग कमी करण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
Kitchen Hacks
Kitchen HacksDainik Gomantak
Published on
Updated on

Kitchen Hacks: स्वयंपाकघरातील सिंकचा वापर खरकटी भांडी ठेवण्यासाठी केला जातो. ते सिंक स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. त्यातील चिकट डाग पाणी आणि साबणाने कमी होत नाही. तसेच त्यात सारखे पाणी साचल्याने गंज येतो. यामुळे स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया सिंक स्वच्छ करण्यासाठी काय करावे.

  • हे काम सर्वात पहिले करावे

सिंकमधून चिकट डाग काढून टाकण्यापूर्वी त्यात असलेले भांडे काढून ठेवावे. नंतर कोमट पाण्यात मिठ मिक्स करून ते पाणी सिंकमध्ये टाकावे. यामुळे चिकट डाग कमी होऊन स्वच्छ करणे सोपे होईल.

  • बेकिंग सोडा

आता सिंकमध्ये बेकिंग सोडा टाकावा. 20-30 मिनिटे असेच राहू द्यावे. बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही सिंक स्वच्छ करू शकता. तुम्हाला सिंगमधील चिकट-काळे डाग कमी करण्यास मदत मिळेल.

  • सिंकचा पृष्ठभाग घासावा

बेकिंग सोड्यावर हलके पाणी टाकून सिंक घासून घ्यावे. असे केल्याने सिंकमधील चिकट डाग निघुण जाण्यास मदत मिळते. लक्षात ठेवा जास्त पाणी वापरू नका. तुम्ही पाण्याएवजी व्हिनेगर देखील वापरू शकता.

  • तुमचे सिंक चमकण्यासाठी या गोष्टी करा

जर तुम्हाला तुमचे सिंक चमकदार ठेवायचे असेल तर ते स्वच्छ केल्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावू शकता. यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यावा आणि त्याला थोडं तेल लावून सिंकला लावावे. लक्षात ठेवा तेल लावताना सिंक पूर्णपणे कोरडे असले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com