SIM Card वापरताना टाळा 'ही' चूक अन्यथा होउ शकते बँक खाते रिकामे...!

सिमकार्ड वापरतांना तुमची एक चुक महागात पडू शकते.
SIM Card
SIM CardDainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल प्रत्येकाकडे दोन मोबाइल आहेत. यामुळे सिम कार्ड वापरताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. एका चुकीमुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमचे बँक अकाउंट देखील रिकामे होउ शकते. नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये बंद पडलेल्या सिमकार्डमुळे (SIM Card) युजरला चांगलाच फटका बसला आहे. चला तर मग जाणून घेउया कोणता काळजी घ्यावी.

सिम कार्ड (SIM Card) सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला त्यात मिनिमम रिचार्ज करावे लागेल. तसे न केल्यास नंबर बंद केला जातो.

एकदा नंबर (Mobile Number) बंद झाला की आपण त्याकडे लक्ष देत नाही. यानंतर नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्या हा नंबर इतरांना देतात आणि त्याच नंबरने तुमचे बँक अकाउंट (Bank Account) देखील अॅक्टिव होते. याबाबत दिल्लीतून एक प्रकरण समोर आले आहे.

यासह आपण नंबरला सर्व आयडी रजिस्टर करतो. आयडी वापरताना आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. याचा फायदा स्कॅमर्स घेतात. कारण याच्या मदतीने त्यांना कोणतीही माहिती अगदी सहज मिळू शकते.

जेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा स्कॅमर्स त्याच्या मदतीने ओटीपी मिळवतात आणि ओटीपी न मागता स्कॅम झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सिमकार्ड स्कॅमच्या यादीत अशाच प्रकारच्या घोटाळ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

SIM Card
USB Type-C: फोन, टॅबलेट वा लॅपटॉप कोणताही असो आता 'नो टेन्शन', लवकरच युनिक चार्जर येतोय बाजारात

मोबाईल नंबर बंद करताना तो नंबर इतर कोणत्याही युजर्सकडे जाऊ नये हे लक्षात ठेवावे. तसेच, जर तुमच्याकडे असा नंबर असेल ज्यावर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणतेही रिचार्ज केले नसेल आणि तुम्हाला ते बंद करायचे असेल तर तुम्ही तो ताबडतोब बंद करावा. ज्या नंबरवर तुम्ही रिचार्ज केलेले नाही असा नंबर कुठेही टाकून देउ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com