USB Type-C: फोन, टॅबलेट वा लॅपटॉप कोणताही असो आता 'नो टेन्शन', लवकरच युनिक चार्जर येतोय बाजारात

भारतात कंपन्या फक्त मोबाइल फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसारख्या साधनांसाठी टाइप-सी पोर्ट वापरतील.
USB Type-C
USB Type-CDainik Gomantak

जगभरात अनेक दिवसांपासून टाइप- सी (Type-C) हा कॉमन चार्जर बनवण्याची चर्चा सुरू होती. आता भारत सरकारने ही एक मानक केबल बनवली आहे. मोबाइल (Mobile) , लॅपटॉप, नोटबुक आणि इतर वस्तूंसाठी टाइप-सी चार्जिंग केबल्स मानक बनल्या आहेत. यामुळे यूजरला वेगळे चार्जर ठेवण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा लागू होताच एका चार्जरने अनेक डिवाइस चार्ज करता येतील.

भारतीय मानक ब्युरो किंवा BIS ने म्हटले की टाइप-सी मानक भारतात (India) विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी असेल. यामुळे चार्जरची संख्या कमी होईल आणि लोक एकाच चार्जरने अनेक डिवाइस चार्ज करू शकतील.

ग्राहकांना आता प्रत्येक वेळी नवीन डिवाइससह वेगळे चार्जर घेण्याची गरज पडणार नाही. यामुळे भारत सरकारचे ई-कचरा कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल, असेही BIS ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

USB Type-C
Arvind Kejriwal: दहा दिवसात 164 कोटी द्या; अरविंद केजरीवाल यांना वसुलीची नोटीस

ते पुढे सांगते की पूर्वीच्या ग्राहकांना वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिवाइससाठी वेगवेगळ्या चार्जरची गरज होती. त्यामुळे ग्राहकांचा खर्चही वाढला होता. याशिवाय ई-कचराही (Electronic Waste) वाढायचा आणि इतर समस्याही निर्माण होत होत्या.

अहवालात पुढे सांगण्यात आले की, जगभरातील देश या समस्येवर मात करण्यासाठी काम करत आहेत. डिसेंबर 2022 मध्ये ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दावा केला होता की स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसाठी USB Type-C चार्जिंग पोर्ट बनवण्यास स्टेकहोल्डरने सहमती दर्शवली आहे.

  • युरोपियन युनियन प्रमाणित टाइप-सी केबल

BIS ने टाइप-सी चार्जरसाठी मानक देखील अधिसूचित केले. अलीकडेच युरोपियन युनियनने टाइप-सी केबलचे मानकीकरण करण्याचा आदेश पारित केला आहे. रोहित सिंग यांच्या मते, युरोपियन युनियनच्या 2024 च्या टाइमलाइननुसार, कॉमन चार्जिंग पोर्ट अशा प्रकारे सोडले जाईल की उद्योग आणि ग्राहक ते सहजपणे स्वीकारू शकतील.

सध्या फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसाठी वेगवेगळे चार्जिंग पोर्ट वापरले जातात तर आयफोन आणि अनेक अँड्रॉइड फोन्सचे पोर्टही खूप वेगळे आहेत. परंतु, या मानकानंतर सर्व कंपन्यांना त्यांच्या डिवाइससह टाइप सी चार्जिंग पोर्ट द्यावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com