Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका

Silent Heart Attack Symptoms: देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये, 'सायलेंट अटॅक'ने धास्ती वाढवली आहे.
Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका
Heart AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Silent Heart Attack Symptoms: देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये, 'सायलेंट अटॅक'ने धास्ती वाढवली आहे. हा प्रकार अधिक जीवघेणा ठरत चालला आहे. गेल्या काही वर्षांत सायलेंट अटॅकच्या अनेक घटना समोर आल्या आहेत की, ज्याचा विचार केला तरी भीती वाटते. कुणाला व्यायाम करताना अटॅक आला तर कुणाचा मॉर्निंग वॉक करताना अचानक पडून मृत्यू झाला. शाळेत नाचताना किंवा शिकवताना सायलेंट अटॅक आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, अशा घटनांबद्दल वाचून, पाहून लोक आता त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरुक होऊ लागले आहेत.

जीवनशैलीतील बदल आणि प्रतिकारशक्तीचा अभाव

गेल्या काही वर्षांत सायलेंट अटॅकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तथापि, सायलेंट अटॅकबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. परंतु डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते, कोरोना काळानंतर जीवनशैलीतील बदल आणि शरीरात प्रतिकारशक्तीचा अभाव ही या अटॅकटची मुख्य कारणे मानली जात आहेत.

Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका
Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

जास्त व्यायाम करणे

डॉक्टरांच्या मते, जास्त व्यायामामुळे किंवा शरीराला जास्त थकवा दिल्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. तरुणांमध्ये सायलेंट अटॅकचे मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज (रक्ताच्या गुठळ्या तयार होणे) स्वरुपात प्लाक जमा होऊ लागतो आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर तो फुटतो, असे मानले जाते. तरुणांमध्ये 75 टक्के अटॅक हे प्लाक फुटल्यामुळे आल्याचे सांगण्यात आले आहे. तरुणांमध्ये प्लाकच्या स्वरुपात अडथळा निर्माण होऊ लागतो, त्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये विविध ठिकाणी गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होऊ शकत नाही. प्लाक जमा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि एका विशिष्ट मर्यादेनंतर, हा प्लाक फुटतो, ज्यामुळे सायलेंट अटॅकच्या घटना घडतात.

कोरोना काळात समस्या वाढली

तज्ज्ञांच्या मते, हृदयात प्लाक जमा होण्याचे एक कारण म्हणजे कोरोनाव्हायरस. या व्हायरसमुळे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे नसा ब्लॉक होतात आणि अचानक अटॅक येतो. लहान वयात, हार्ट प्लाक तयार करण्यास तयार नसते, ज्यामुळे जर तरुणाला अटॅक आला तर त्याचा तात्काळ मृत्यू होतो. गेल्या काही वर्षांपासून या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका
Heart Attack Symptoms: सावधान ही आहेत हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

लक्षणे

श्वास कोंडणे व धाप लागणे

छातीत जडपणा जाणवणे

अवयवांमध्ये वेदना होणे- हात, कंबर, मान, जबडा आणि पोटाच्या आसपासच्या अवयवांमध्ये वेदना.

घाम घेणे

मळमळ आणि चक्कर येणे

Silent Heart Attack: 'सायलेंट अटॅक' ठरतोय जीवघेणा! तरुणांमध्ये वाढली धास्ती; वेळीच ओळखा लक्षणं अन् टाळा धोका
Heart Attack आणि कोरोना लशीचा खरचं संबंध आहे का? अभ्यासात समोर आली नवी माहिती

या लोकांनी रहावे सावध

मधुमेहाव्यतिरिक्त, लठ्ठपणा, हाय ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉलची पातळी, खराब जीवनशैली आणि धूम्रपान किंवा मद्यपान यामुळे सायलेंट हार्ट अटॅक येण्याचा धोका असू शकतो. अशा लोकांना सायलेंट हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com