Signs That Someone Loves You: तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो का? जाणून घ्या 'या' 'टिप्स'द्वारे

कोणीतरी तुमच्यावर प्रेम करत आहे की नाही?
Cricket Love
Cricket LoveDainik Gomantak
Published on
Updated on

नातेसंबंध जपताना एखादी व्यक्ती तुमच्यावर खरोखर प्रेम करते की नाही हे जाणून घेण्याचा कोणताही विशिष्ट मार्ग नाही, परंतु काही चिन्हे आहेत जी तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात काय आहे हे शोधण्यात मदत करतात. आणि तुम्हाला समजेल की, आपण योग्य मार्गावर आहे की नाही.

प्रेम अनुभवणे अनेकांसाठी सुखकारक असतं तरीही वास्तविक जीवनात, हे आश्चर्यकारक खुलासा करणारे, कधी निराशाजनक, कधी वेदनादायक आणि कधी आपल्याला जीव लावणारं देखील असते. तुम्ही एकत्र असताना ती व्यक्ती कशी वागते, काय बोलते? आणि काय करते? यावरुन, तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते की नाही, हे स्पष्ट होऊ शकते. कोणीतरी तुमच्यावर खरोखर प्रेम करते की नाही हे जाणून घेण्याचा कोणताही विशिष्ट मार्ग नाही, परंतु काही चिन्हे आहेत जी तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात काय आहे हे शोधण्यात मदत करतात.

तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो का?

व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आनंदी आहे का?

जर एखादी व्यक्तीचा दिवस खूप वाईट गेला असेल तरीही व्यक्ती आपल्या सहवासाने ते आनंदीत होत असेल तर ते प्रेमाचे लक्षण आहे. जर तो अथवा ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर फक्त तुमचा चेहरा किंवा तुमचा आवाज पाहून त्याला अथवा तिला बरे वाटेल याची खात्री आहे. पुढच्या वेळी तुमचा मूड खराब असेल तेव्हा ती अथवा तो कसा प्रतिक्रिया देतो हे यातून हे आपल्याला समजू शकते.

तो अथवा ती "आई लव यू" असे म्हणतो आणि त्याचा अर्थ काय आहे?

जर तुमचा जोडीदार तुमच्यावर खरंच प्रेम करत असेल आणि सरळ तुमच्या डोळ्यात पाहत असेल आणि या वेळी तुमच्याकडून वेगळी अपेक्षा करत नसेल, तर हे शक्य आहे की तो तुमच्यावर खरोखर प्रेम करतो. जर ती व्यक्ती तुमच्यावर खरच प्रेम करत असेल, तर ते विनाकारण ते सहजच व्यक्त करील आणि यावेळी त्यांना आणखी कोणतीही अपेक्षा असणार नाही.

ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते का?

जेव्हा कोणी तुमच्यावर खरंच प्रेम करते अथवा करतो तेव्हा ते तुमच्याशी बोलताना पूर्णपणे खुलतात. जर तुम्हाला ती व्यक्ती संपूर्ण खुलून बोलत असतील आणि यावेळी इतरांशी बोलताना अधिक खुलत नसेल तर ते प्रेमाचे लक्षण असू शकते.

उदाहरणार्थ, जर तुमचा जोडीदार सार्वजनिक ठिकाणी खूप गंभीर किंवा नम्र असेल, परंतु तुम्ही एकटे असताना मूर्खपणा दाखवत असेल, तर तो किंवा ती खरोखर तुमच्यावर प्रेम करते आहे. जर ती व्यक्ती आपल्या मनातील खोल भावना तुमच्याशी शेअर करत असेल तर ते तुमच्यावरील करत असलेल्या प्रेमाचं लक्षणं आहे.

Cricket Love
Pre-Marriage Date : ज्या मुलीशी लग्न ठरलंय तिला पहिल्यांदा भेटताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात; नाते होईल घट्ट

ती व्यक्ती तुम्हाला कशी पाहते?

कोणीतरी तुम्हाला दिलेली मिठीच तुमचा आत्म्याला अतिव सुख देत असेल तर तुम्ही बरोबर मार्गावर आहात. तुमच्याबद्दल तुमच्या पार्टनरची मत काय आहेत. आणि तो अथवा ती काय विचार करते हे तीच्याशी बोलताना समजून घ्याच. मुख्यत: सकाळी किंवा रात्री जेवणाच्या टेबलावर निवांत असताना याबाबत बोला, अधिक स्पष्ट बोलेल आणि यातून ती प्रेम करते की नाही समजण्यास समजू शकेल

Cricket Love
Christmas Party: ख्रिसमस पार्टीसाठी लाल-पांढरा नाही तर 'या' रंगांची करा निवड

तो तुमच्या भविष्याबद्दल एकत्र बोलतो का?

जर ती व्यक्ती भविष्याबद्दल बोलत असेल आणि त्यात तुम्हाला नेहमी सामील करत असेल, तर ती तुमच्यावर खरोखर प्रेम करते आहे. कारण खरी वचनबद्धता म्हणजे दुसर्‍या व्यक्तीसोबत भविष्यातील स्वप्नातील महाल बांधणे.

तुम्ही भविष्यात काय करणार आहात ? भविष्यात तुमचे आयुष्य एक, दोन किंवा दहा वर्ष कसे असेल? तुमची मुले कशी दिसतील? तुम्ही एकत्र कुठे निवृत्त व्हाल? किंवा कुठे ? याविषयी ती व्यक्ती नियमितपणे बोलत असेल. तर मग कदाचित ती अथवा तो तुझ्यावर प्रेम करतो हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com