Christmas Party: ख्रिसमस पार्टीसाठी लाल-पांढरा नाही तर 'या' रंगांची करा निवड

Fashion Tips: यावर्षी ख्रिसमसला तुम्ही हटके लुकमध्ये पार्टीला जाउ शकता.
Christmas Party | Christmas Day 2022 | Christmas Festival | Christmas Fashion Tips
Christmas Party | Christmas Day 2022 | Christmas Festival | Christmas Fashion TipsDainik Gomantak

Christmas 2022: जगभरात दरवर्षी 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस हा ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमसला अवघे काही दिवसच उरले आहेत. ख्रिसमसच्या दिवशी लोक आपली घरांवर सुंदर सजवट करतात. यासोबतच ख्रिसमस पार्टीमध्ये थीमच्या रंगांची देखील विशेष काळजी घेतली जाते. तसे तर या दिवशी बहुतेक लोक लाल आणि पांढर्‍या रंगाच्या थीमला ठेवतात. पण यंदा तुम्ही काही वेगळ्या रंगाच्या थीम ठेउन हटके पध्दतीने उत्सव साजरा करु शकता.

  • ब्राउन रंग

जर तुम्हाला काहीतरी हटके आणि आकर्षक ठेवायचे असेल तर तुम्ही तुमचा थीम कलर म्हणून ब्राउन रंग निवडू शकता. जेव्हा प्रत्येक जण पार्टीमध्ये सेम रंगाचे कपडे घालतील तेव्हा ते अप्रतिम दिसेल.तुमच्या पार्टीची शोभा वाढेल.

  • पांढरा

ख्रिसमसला तसे तर नेहमीच लाल- पांढरे कपडे घातले जातात. पण यावेळी काहीतरी हटके प्लॅन करायचे असेल तर फक्त पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची थीम ठे वा. तुम्ही पांढरे स्वेटर किंवा जॅकेट सह निळी जीन्स किंवा स्कर्ट टीमअप करु शकता.

Christmas Party | Christmas Day 2022 | Christmas Festival | Christmas Fashion Tips
Relationship: पार्टनरमध्ये 'या' क्वॉलिटीजच्या शोधात असतो प्रत्येक व्यक्ती
  • हिरवा रंग

ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही साजरी करण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाची थीम निवडू शकता. या रंगाच्या आउटफिटसह तुम्ही लाल, पांढरा किंवा ब्राउन या रंगांना एकत्र करू आउटफिट घालू शकता.

  • मरुन

ख्रिसमस फेस्टीव्हलसाठी लाल रंग कॉमन आहे. यावेळी तुमच्या पार्टीमध्ये मरून कलरची थीम ठेउ शकता. त्यात पांढरा रंगाची जीन्स,स्कर्ट घालू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com