Shravan Somwar 2023: पहिला श्रावणी सोमवार; श्रावणात सोमवारला इतकं महत्त्व का? वाचा एका क्लिकवर

श्रावण सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.
Shravan Somwar 2023
Shravan Somwar 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Shravan Somwar 2023: हिंदू कॅलेंडरनुसार १७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. या श्रावणात चार सोमवार आले आहे.

पहिला श्रावण महिना हा आज असून दुसरा २८ ऑगस्ट, तिसरा ४ आणि ११ सप्टेंबर या दिवशी असणार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पुजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय असतो. तसेच श्रावण सोमवारला अधिक महत्व आहे.

  • श्रावण सोमवार व्रताचे महत्व

हा श्रावण महिना एक महिना चालणार आहे. यामुळे श्रावणात चार सोमवार आले आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या पुजेसाठी सर्वोत्तम महिनी मानला जातो.

कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शिव प्रसन्न होतात आणु तुमच्या सर्व मनोकामना पुरण होतात.

श्रावणात महादेवाची रोज सकाळी पुजा केली जाते. पण श्रावणातील सोमवारला खुप खास महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा भगवान शंकराला समर्पित दिवस आहे.यासाठी श्रावण सोमवार महत्वाचा आहे.

Shravan Somwar 2023
Shravan Special: शिवलिंगाची पुजा करताना काय करावे अन् काय करू नये, वाचा एका क्लिकवर

धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मनोभावे कठोर तपश्चर्या केली.

माता पार्वतीच्या मनोभावे केलेल्या कठोर तपश्चर्यने प्रसन्न होऊन भगवान शंकराने माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले.

अशा प्रकारे माता पार्वतीचा भगवान शंकराशी विवाह झाला. यामुळे श्रावण महिना माता पार्वती आणि भगवान शंकराचा आवडता महिना आहे. यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवार खुप महत्वाचा आहे.

यामुळे श्रावण सोमवार विवाहित महिला आणि अविवाहित मुलींसाठी खुप खास आहे. श्रावण सोमवारी विवाहित महिला दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकराची पुजा करतात.

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात तर अविविहित मुली श्रावण सोमवारी भगवान शंकराची पुजा करतात.

  • श्रावणात महादेवाची पुजा कशी करावी?

धार्मिक मान्यतेनुसार महादेवाची पुजा करतांना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. यानंतर तुमच्या घरातील भगवान शंकराला गंगाजल,दूध,दही,मधाने अभिषेक करावा.

अभिषेक करतांना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. त्यानंतर शिवलिंगावर बेलाचे पान, धोतऱ्याचे फुल आणि फळ, अर्पण करावे.

नंतर शिव चालीसाचे पठण करावे. आपल्या पती आणि कुटूंबाच्या दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

  • श्रावणात महादेवाला काय अर्पण करावे

श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलाचे पान, फुल आणि पळ अर्पण करावे.

भगवान शंकराला भस्म अर्पण करावे.

हळद, कुंकू, तुळशीचे पान अरपण करू नये.

नारळ आणि तुटलेला तांदूळ भगवान शंकराच्या पूजेमध्ये कधीही अर्पण करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com