Shravan Month
Shravan MonthDainik Gomantak

Shravan Special: शिवलिंगाची पुजा करताना काय करावे अन् काय करू नये, वाचा एका क्लिकवर

आज पासून श्रावण महिना सुरू होत असून शिवलिंगाची पुजा करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Published on

Shravan Special Puja: हिंदू धर्मानुसार आजपासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना शंकराला प्रिय आहे.

या महिन्यात शंकराची मनोभावे पुजा केल्याने अनेक समस्या दूर होतात. यामुळे शिवलिंगाची पुजा करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. अन्याथा तुम्हाला गंभीर परिणाम भागावे लागू शकतात.

शिवलिंगाची पुजा करताना कोणती काळजी घ्यावी

  • शिवलिंगाचा आकार

तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर ती अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसावी. असे शिवपुराणांमध्ये सांगितले आहे. अन्याथा तुम्हाला विपरित परिणाम भोगावे लागू शकतात.

  • योग्य दिशा

शिवलिंगाला जल अर्पण करताना नेहमी उत्तरेकडे तोंड करून बसावे.या दिशेला तोंड करून बसल्याने महादेव आणि पार्वती यांची कृपा राहते.

  • तांब्याचे भांडे वापरावे

महादेवाला जल अर्पण करताना तांब्याचे भांडे वापरावे.स्टीलच्या भांड्यात जल अर्पण करणे अशुभ मानले जाते. तसेच लोखंडी भांडे वापरू नका.

Shravan Month
Adhik Maas 2023: अधिकमास मध्ये काय करावे अन् काय करू नये वाचा एका क्लिकवर
  • नियमितपणे पुजा करावी

शिवलिंगाची नियमितपणे पुजा करावी.वेळेअबावी शिवलिंगावर जलाभिषेक करणं शक्य नसेल तर शिवलिंगाची स्थापना करू नये.तुम्ही जर नियमितपणे पुजा केली नाही तर महादेव नाराज होऊ शकतात.

  • महादेवाचा फोटो

घरामध्ये चुकूनही महादेवाचा रागीट मुद्रा असलेला फोटो लावू नका. यामुळे घरता वाद निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com